वाढदिवसाचे गिफ्ट मिळाले म्हणार्यांनो प्रत्यक्षात पीक विमा भरण्यासाठी जी.आर कुठयं.।

 ◼️वाढदिवसाचे गिफ्ट मिळाले म्हणार्यांनो प्रत्यक्षात पीक विमा भरण्यासाठी जी.आर कुठयं.। ........................................◼️.... पीक विम...

 ◼️वाढदिवसाचे गिफ्ट मिळाले म्हणार्यांनो प्रत्यक्षात पीक विमा भरण्यासाठी जी.आर कुठयं.।


........................................◼️.... पीक विमा भरण्यासाठी खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या प्रयत्नाला यश 


.........................................


◼️2100 कोटी रुपये जिल्ह्यातील बँकेला कर्जमाफीची मिळुन शेतकऱ्यांना फक्त पाच टक्के कर्जवाटप ........आ.सुरेश धस


 


      आष्टीःदादासाहेब बन.


       जवळपास 2100 कोटी रुपये कर्जमाफीची रक्कम मिळूनही त्याचा लाभ शेतक-यांना मिळत नसून शेतक-यांना देशोधडीला लावण्याचे काम बॕका करीत आहेत.तसेच शेतक-यांना कर्ज वाटप बॅका व्यवस्थित करत नसून सरकारकडून आलेल्या पैशांच्या ठेवी ठेवत त्यावर व्याज कमविण्याचा धंदा बॕकांनी मांडला असल्याचा आरोप करुन 2 हजार कोटी रुपयाचे पिककर्ज वाटपाचे टार्गेट कशाच्या आधारे ठेवले आहे.वास्तविक पाहता जर 2100 कोटी रुपये शेतक-यांना कर्जमाफी मिळालेली असेल तर नवीन व माफीत बसलेल्या शेतक-यांना पिककर्ज वाटपासाठी जवळपास चार हजार कोटीच्या आसपास रक्कम लागेल हि वस्तूस्थिती असताना बॕका याकडे सपशेल डोळेझाक करत असल्याचा आरोप आ.सुरेश धस यांनी आष्टी येथील निवासस्थानी आयोजीत पञकार परिषदेत केला आहे.


पुढे बोलताना आ.धस म्हणाले की,जिल्ह्याचे पालकमंञी यांच्या वाढदिवसानिमित्त शेतक-यांना पिकविमा सुरू झाल्याचे गिफ्ट देत असल्याचे काहींनी सांगितले माञ आजही आॅनलाईन जीआर बघीतला तर कुठेच हे गिफ्ट कुणालाच दिसणार नसल्याचा आरोपही आ.धस यांनी केला.तर डिएलटीसीच्या माध्यमातून जिल्हाधिका-यांनी या बॕकांवर कर्ज वाटपासाठी दबाव निर्माण करण्याची गरज असल्याचेही आ.धस म्हणाले.पुढे बोलताना धस म्हणाले की,आम्ही सोमवारी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आष्टी मतदार संघातील बॅक,महसूल व कृृृषी कार्यालयावर संबूळं वाजवून व बैलगाडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.त्यानंतर काही बॕकांनी थोड्या प्रमाणात बीड जिल्ह्यात पिक कर्ज वाटपास सुरुवात केली.परंतु मागील सरकारच्या काळातील आकडेवारी पाहता छञपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना 2018 ची बॕकनिहाय प्राप्त रकमा कोटीमध्ये पुढीलप्रमाणे आहेत डिसीसी बॕक 184.43 कोटी,महाराष्ट्र ग्रामीण बॕक 164.90 कोटी,स्टेट बॕक आॕफ इंडिया 427.97 कोटी,आयडीबीआय बॕक 2.25 कोटी,बॕक आॕफ इंडिया 11.26 कोटी,बॕक आॕफ बडोदा 7.93 कोटी,कॕनरा बॕक 3.73 कोटी,अॕक्सीस बॕक 0.8 कोटी,युनियन बॕक आॕफ इंडिया 2.47 कोटी,पंजाब नॕशनल बॕक 0.14 कोटी,सिंडीकेट बॕक 0.73 कोटी,बॕक आॕफ महाराष्ट्र 46.69 कोटी,सेंट्रल बॕक आॕफ इंडिया 8.88 कोटी इतकी रक्कम असून एकूण 858 कोटी 46 लाख रु.प्राप्त झाले.या माफीतील शेतकरी हा महात्मा " ज्योतीराव फुले योजनेमध्ये आलेले नाहीत.तर महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2020 मध्ये जिल्ह्यातील शेतक-यांना बॕक निहाय प्राप्त झालेली रक्कम हि खालीलप्रमाणे आहे.आंध्रा बॕक 92008,अॕक्सीस बॕक 354810,बॕक आॕफ बडोदा 154838717 कर्ज वाटप 16 कोटी,बॕक आॕफ इंडिया 141852840 कर्ज वाटप 8 कोटी,बॕक आॕफ महाराष्ट्र 475645893 कर्ज वाटप 18 कोटी,डिसीसी बॕक 229.5799920 कर्ज वाटप रक्कम 43 कोटी,कॕनरा बॕक 31792126,सेंट्रल बॕक आॕफ इंडिया 255169106 कर्ज वाटप 8 कोटी,कार्पोरेशन बॕक 158615,एचडीएफसी बॕक 124584,


आयसीआयसीआय बॕक 5623603,आयडिबीआय बॕक 142683601,इंडियन ओवरसीज बॕक 448893,महाराष्ट्र ग्रामीण बॕक 3018346047 कर्ज वाटप 151 कोटी,पंजाब नॕशनल बॕक 5808804,आरबीएल बॕक 702161,स्टेट बॕक आॕफ इंडिया 4765403297 कर्ज वाटप 65 कोटी,सिंडीकेट बॕक 29278536,युको बॕक 1216392,युनियन बॕक आॕफ इंडिया 60546305,एकूण अकराशे अडोतीस कोटी 57 लाख 85 हजार 161 रुपये पैकी माञ 309 कोटी रुपयांचे वाटप झालेले आहे.म्हणजे आज पर्यंत बीड जिल्ह्यातील दोन लाख पाच हजार शेतक-यांना अकराशे अडोतीस कोटी रुपये कर्जमाफीचे प्राप्त झाले आहेत.त्यापैकी फक्त 53 हजारच शेतक-यांना 309 कोटींचे वाटप झाले आहे.अद्याप एक लाख बावन्न हजार शेतक-यांना कर्ज वाटप झालेले नाही.800 कोटींचे पिककर्ज वाटप हे करावयाचे राहिले आहे.ही आकडेवारी फक्त कर्जमाफी मिळालेल्या शेतक-यांचीच आहे.अद्याप शासनाने नियमीत कर्ज भरणा करणा-या शेतक-यांची कर्जवाटपाची माहिती स्वञंञरित्या दिलेली नाही.ती तात्काळ देण्याची मागणी आ.सुरेश धस यांनी केली आह


 


◼️बांधावर शेतक-यांना खताचा पुरवठा करु म्हणणा-या सरकारने किमान कृषी दुकानात तरी मुबलक खताचा पुरवठा करण्याची मागणी आ.धस यांनी केली.◼️


 


🔴आष्टी तालुका दुध संघ प्रति लिटर 23 रुपये प्रमाणे दुधाला भाव देत आहे.त्यामुळे इतर दुध संस्थानी किमाण 21 रुपये लिटर प्रमाणे दुधाला भाव देण्याची मागणी आ.धस यांनी केली आहे.



 


COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group