- राज्यपाल कोट्यातून सुबोध काकांनी यांना विधान परिषदेवर घ्याच!
कमल राठी यांची रास्त मागणी
राज्यपाल कोट्यातून धर्माबाद चे तरुण उद्योजक सुबोध काकांनी यांना विधानपरिषदेवर आमदार म्हणून घ्याच अशी आग्रही व रास्त मागणी माहेश्वरी समाजाचे प्रमुख मार्गदर्शक औद्योगिक वसाहत धर्माबाद चे माजी चेअरमन तथा प्रसिद्ध व्यापारी कमलजी राठी यांनी एका निवेदनाद्वारे थेट राज्यपाल, जिल्हाधिकारी ,उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, तथा सर्व राजकीय पक्ष प्रमुखाकडे केली आहे. भारतातच नव्हे तर जगाच्या काना कोपर्यात माहेश्वरी समाज हा आजतागायत विविध सेवाभावी संस्था',उद्योगधंदे ,व व्यापाराततून देश सेवा व समाजसेवा करीत आहे ही वस्तुस्थिती आहे . देशाच्या अर्थव्यवस्थेत तब्बल 33 टक्क्यांचा जी.डी.पी.चा वाटा महेश्वरी समाजाचा आहे व भारताच्या कानाकोपऱ्यातील यशस्वी राजकारणाच्या मागे एक तर माहेश्वरी समाजाचे व्यक्तिमत्व दृश्य दृश्य स्वरूपात असते हे सर्वश्रुत आहे. उच्च प्रतीचे विश्वासार्हता संपादन केली आहे. समाजसेवा राजकारणात उतरूनही प्रांजळपणे करता येते ही माहेश्वरी समाजाला कळून चुकले आहे. धर्माबाद चे युवा उद्योजक ज्यांनीआपल्या महत्वकांक्षी व्यापार सहकार क्षेत्रातून समाजसेवेसह धार्मिक कार्य करून शहराचे नाव महाराष्ट्रासह देशात प्रसिद्ध केले.त्याच्या समाजसेवेच्या बुध्दीची भरारी पाहून माहेश्वरी समाजासह सर्व जाती धर्मातील लोक अतिशय थक्क व प्रभावित झाल्याचे चित्र आज सर्वत्र पहावयास मिळत असून त्याची पोचपावती म्हणून त्यांना राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर आमदार म्हणून सेवा करण्याची संधी दिल्यास माहेश्वरी समाज महाराष्ट्र राज्य ,मराठवाडा विभाग, नांदेड जिल्हा व धर्माबाद तालुका अतिशय ऋणी राहील अशी आग्रही भावनिक व रास्त मागणी कमलजी राठी यांनी केली असून आपल्या परीने अखिल भारतीय माहेश्वरी समाज महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय माहेश्वरी समाज नांदेड जिल्हा व धर्माबाद तालुका माहेश्वरी समाजातर्फे मागणी करण्यात येणार आहे .
-- ग्लोबल मराठावाडा न्यूजसाठी , अहमद लड्डा धर्माबाद.
COMMENTS