- कोरोणातुन बऱ्या झालेल्या ' त्या 'दोन महिलांना दिली सुट्टी.***
त्या दोन महिलांचा
लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी केला सत्कार...***
सेलू प्रतिनिधी
सेलू शहरातील हासमुख काँलनीतील कोरोना बाधीत दोन महिलावर उपजिल्हा रुग्णालयाने शासकीय वसतीगृह ईमारतीत कार्यान्वित केलेल्या कोवीड सेंटरमध्ये उपचराअंती बऱ्या झाल्याने यांना २ जुलै रोजी सकाळी ११ वा सुट्टी देण्यात आली.
जांब येथील आजारी आईच्या संपर्कातून हासमुख काँलनीतील दोन महिला कोरोना बाधीत झाल्या होत्या. या दोन महिलांसह संपर्कातील तिघे अशा पाच जणांना येथील शासकीय वसतीगृहात कार्यान्वित केलेल्या कोविड सेंटरमध्ये २३ जुन रोजी भरती करण्यात आले होते.दरम्यान संपर्कातील तिघांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना सुट्टी दिली.तर त्या दोन कोरोना बाधीत महिला वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजय हरबडे ,वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक पाटील,यांच्या निगरानीखाली औषधोपचार घेत होत्या.यावेळी कोवीड सेंटर चे गृहपाल महेंद्र गोणारकर व ईतर.कर्मचाऱ्यांनी या कोरोणा बाधीतांची उत्तम देखभाल केली. उपचाराअंती.या दोनही महिला या आजारातुन पूर्णतः बऱ्या झाल्याने त्यांना २ जुलै रोजी सुट्टी देण्यात आली. यावेळी आमदार मेघना बोर्डीकर ,उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी,नगराध्यक्ष विनोद बोराडे, न.प.मुख्याधिकारी देविदास जाधव,वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजय हरबडे,गृहपाल महेंद्र गोणारकर यांनी या दोन महिलेचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सेलू तालुक्यात कोरोना बाधीतांची संख्या ९ झाली असुन त्यापैकी २ रूग्ण मयत झाले तर ६ जणं कोरोनामुक्त झाले तर एक जणं ईतर आजारावर नांदेड येथे उपचार घेत आहे.
एकंदरीत सेलू तालुक्यातील कोरोनाची साखळी खंडीत झाल्याने प्रशासनाबरोबरच तालूका वासीयांना दिलासा मिळाला आहे
यावेळी बोलतांना आ.मेघना बोर्डीकर म्हणाल्या की,आपल्या विभागाचे उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी व सर्व
प्रशासनाच्या चांगल्या नियोजनामुळे कोरोना ची साखळी खंडीत झाली आहे.त्यामुळे मि या सर्व प्रशासनाचे कौतुक करत आहे.परंतु यापुढे प्रत्येकाने फिजिकल डिस्टनसिंग, मास्क व स्वच्छता अशा त्रिसुत्राचा अंगीकार करावा असे अवाहन आ.बोर्डीकर यांनी यावेळी केले.
तर उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी म्हणाले की,सर्वांच्या सहकार्यामुळे,नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे प्रशासनाला कोरोनावर मात करणे शक्य झाले. असे सांगत यापुढे ही प्रत्येक नागरिकांनी नियमाचे तंतोतंत पालन करावे.बाहेरून येणाऱ्या व्यक्ती ला क्वारंटाईन करावे असे पारधी यांनी अवाहन केले.
....चौकटीचा मजकूर..... यावेळी मनोगत व्यक्त करतांना आम्ही आमची आई बिमार असल्यामुळे त्यांना भेटण्यासाठी गेलो होतोत. आईला कोरोना झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले वआम्ही तिच्या संपर्कात आल्यामुळे आम्हालाही दिवस, राञभर शेतात रहावे लागले दुसऱ्या दिवशी आम्ही आमच्या गावी परत आलो होतो व घरामध्ये राहिलो कोणाच्याही संपर्कात आलो नाहीत व आमचे तपासणी केल्यानंतर आम्ही कोरणा बाधित असल्याचे डॉक्टरांनी सांगितले महिलेने मि हिंम्मत धरली व डॉ. संजय हरबडे व आरोग्य कर्मचारी आमचे मनोबल वाढवत होते. या मंडळीने औषधोपचार करून धिर दिला.आमच्या जेवणाची रहाण्याची उत्तम सोय केली. मनोबल वाढविले⁷ आणि कोरोनातुन मुक्ती मिळाली माझा परीवार सदैव प्रशासनाच्या ऋणात राहील.......
संचलन गृहपाल महेंद्र गोणारकर यांनी केले तर प्रास्ताविक वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजय हरबडे यांनी केले तर नागेश कान्हेकर यांनी आभार मानले.
COMMENTS