कोरोना च्या महामारीने त्रस्त जनतेला पेट्रोल-डिझेल दरवाढीचा फटका.
सध्या जगात कोरोना महामारीने थयमान घातले असून सर्व सामान्य जनता त्रस्त झाली आहे .व केंद्र सरकार पेट्रोल व डिझेलचे वाढते दरवाढीचा जनताला फटका बसत आहे. त्यामुळे केंद्र सरकाराचा जाहीर निषेध करण्यात आला.
आज 3 जुलै रोजी धर्माबाद येथील तहसील कार्यालय समोर काँग्रेस (आय )च्या कार्यकर्त्या कडून जोरदार घेषणाबाजी ,धरणे आंदोलने करून केंद्र सरकाराचा विरोधात नारेबाजी केली .
यावेळी तालुकाध्यक्ष दत्ताहारी पाटील चोळाखेकर यांनी सांगितले की पेट्रोल डिझेल चे भाव दररोज वाढत आहेत व जनता दुहेरी संकटाच्या सामना करतना सामान्य जनतेचे प्रचंड तारांबळ उडत आहे.
डॉ.अनिल रत्नाळीकर यांनी सांगितले आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाची किंमत पाहता पेट्रोल व डिझेल च्या किंमतीत मोठी तफावत (वाढ) झाली आहे. यावेळी धरणे आंदोलनात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य गोविंद पाटील रोशनगावकर, माजी नगराध्यक्ष दिगंबर लखमावाड, न.पा.चे सभापती निलेश पाटील, वर्णी नागभूषण ,सायारेड्डी गंगाधर, व्यापारी प्रकाश गुजराथी शहर काँग्रेस अध्यक्ष ताहेर पठाण, अविनाश पाटील जुन्नीकर, राजेश्वर रामपुरे ,गजानन जंगलोड ,अनेक असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सुरक्षा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता.
-- ग्लोबल मराठवाड़ा न्यूजसाठी - अहमद लड्डा,धर्माबाद.
COMMENTS