- काल रुग्णवाढीचा पुन्हा उच्यांक ३० जण कोरोना बाधित ; १२ व्यक्ती कोरोनातून बरे झाले तर एकाचा मृत्यू
नांदेड :- कोरोना आजारातून आज पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील १२ बाधित व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ३५३ व्यक्तीं कोरोनातून बरे झाले आहेत. गुरुवार ९ जुलै २०२० रोजी प्राप्त झालेल्या अहवालात नवीन ३० व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील एकुण बाधित व्यक्तीची संख्या ५४१ एवढी झाली आहे.
विजयनगर येथील ७५ वर्षाचा एका पुरुषाचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला आहे. या बाधितावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. या बाधिताला उच्च रक्तदाब, श्वसनास त्रास आणि मधुमेह इत्यादी आजार होते. त्यामुळे आतापर्यंत नांदेड जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत्यू बाधितांची संख्या २४ एवढी आहे.
आज बाधित झालेल्या व्यक्तींमध्ये देगलूर नाका येथील २५ वर्षाचा १ पुरुष, नांदेड तालुक्यातील वाघी येथील २५ वर्षाची १ महिला, मुखेड नाथनगर येथील ६ महिन्याचे १ बालक व ३१ वर्षाची १ महिला तसेच मुदखेड येथील ३३ वर्षाचा १ पुरुष यांच्या समावेश आहे व सर्व बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच चाळीसगाव येथील ३० वर्षाचा १ पुरुष, लक्ष्मीनगर येथील २४, २७ व ४५ वर्षाच्या ३ महिला, नवीन हस्सापूर येथील ४५ वर्षाची १ महिला, मोहसीन कॉलनी ४७ वर्षाची १ महिला, धनगर टेकडी नांदेड येथील ४२ व ४५ वर्षाचे २ पुरुष, १ पुरुष वय १६ वर्ष रा. गांधीनगर बिलोली जी. नांदेड,१ पुरुष वय २८ वर्ष रा.फारुकी गल्ली नांदेड, १ पुरुष वय ४१ वर्ष रा. वाघाळा नांदेड, १ पुरुष वय ४७ वर्ष गोकुळ नगर नांदेड, २ पुरुष रा. व्यंकटेश नगर मुखेड जी. नांदेड, ५ पुरुष वय अनुक्रमे ४५, ४३,१६,३, २७ वर्ष रा. तागलीने गल्ली मुखेड जी. नांदेड, ६ महिला वय अनुक्रमे ९, ३५, ४३, १३, २८, ३० वर्ष रा. तागलीने गल्ली मुखेड जी. नांदेड, यांचा समावेश आहे.
आतापर्यंत ५४१ बाधितांपैकी ३५३ बाधितांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. उर्वरीत १६४ बाधितांवर औषधोपचार चालू आहेत. यातील १८ बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात १० महिला बाधित आणि ८ पुरुष बाधित यांचा समावेश आहे.
नांदेड जिल्ह्यात १६४ बाधित व्यक्तींमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे ४९, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे ६९ , मुखेड कोविड केअर सेंटर येथे २३, नायगाव कोविड केअर सेंटर येथे ८, जिल्हा रुग्णालय येथे ५ बाधित, बिलोली कोविड केअर सेंटर येथे ८ बाधित, हिमायतनगर कोविड केअर सेंटर येथे २, देगलूर कोविड केअर सेंटर येथे २, किनवट कोविड केअर सेंटर येथे २, हदगाव कोविड केअर सेंटर येथे १ बाधित तसेच नांदेड शहरातील एका खाजगी रुग्णालयात २ बाधित व्यक्ती उपचार घेत असून ६ बाधित औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत.
९ जुलै २०२० रोजी २४८ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होईल.
जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.
सर्वेक्षण- १ लाख ४७ हजार ५३०,
घेतलेले स्वॅब- ७ हजार ६१०,
निगेटिव्ह स्वॅब- ६ हजार ३२९,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या – १३,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती – ५२४,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या – १२,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या – २,
मृत्यू संख्या – २४,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या – ३५३,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती – १४७,
स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची २४८ एवढी संख्या आहे.
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
COMMENTS