धर्माबाद (अहमद लड्डा) वॉटर सप्लाय चे माजी प्रसिद्ध अभियंता अलहाज, ख्वाजा बदीयोद्दीन महम्मद अफजलोद्दीन यांचे मंगळवारी राहत्या घरी निधन झाले...
धर्माबाद (अहमद लड्डा) वॉटर सप्लाय चे माजी प्रसिद्ध अभियंता अलहाज, ख्वाजा बदीयोद्दीन महम्मद अफजलोद्दीन यांचे मंगळवारी राहत्या घरी निधन झाले ते 75 वर्षाचे होते. मागील कांही दिवसांपासून त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना. हैद्राबाद च्या केअर हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांचे उपचार चालू होते. निधनाच्या दहा दिवस अगोदर त्यांना धर्माबादला आणण्यात आले होते. मंगळवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मावळली. ते 1970 पासून वॉटर सप्लाय मध्ये अभियंताच्या पदावर कार्यरत होते व 2003 मध्ये सेवानिवृत्त झाले होते. त्यांनी 33 वर्ष सेवा दिली आहे. यांच्या पश्चात 2 मुले व 3 मुली, जावई, सुना, नातू आणि पणतू असा मोठा परिवार आहे. सर्व समाजाच्या लोकांसोबत त्यांचे चांगले सबंध होते यांच्या निधनाने मोठी हानी झाली आहे.
COMMENTS