गरिब घरातील नवविवाहितमुलीचा चाकूने भोसकून खुन*  *भररस्त्यात समाजकंटकांनी केला हल्ला*🛑

🛑 * गरिब घरातील नवविवाहितमुलीचा चाकूने भोसकून खुन*  *भररस्त्यात समाजकंटकांनी केला हल्ला*🛑 मंठा जिल्हा जालना येथील घटना  *वैष्णवीचा गुन्हा ...

🛑 *गरिब घरातील नवविवाहितमुलीचा चाकूने भोसकून खुन* 


*भररस्त्यात समाजकंटकांनी केला हल्ला*🛑


मंठा जिल्हा जालना येथील घटना


 *वैष्णवीचा गुन्हा काय ती एक स्त्री होती ?*


वैष्णवीचा जन्म आठराविश्व दारिद्रयात आई अशामती व वडील नारायण गोरे यांच्या पोटी झाला.वडील नारायण गोरे मंठा शहरात रिक्षा चालवतात. वैष्णवी 10 वीच्या वर्गात शिक्षण घेत असतानाच मंठा शहरात राहणारा शेख अल्ताफ शेख बाबू यांनी वैष्णवीला त्रास देने सुरू केले तिने अनेक वेळा तू माझ्या मागे लागू नको सांगितले पण त्यांनी त्रास देणे सोडले नाही.वडिलांनी त्याला समजावून संगीतले पण शेख अल्ताफने घराच्या बाहेर पडले की छेड काढणे वाढवले. शेख अल्ताफ गुंड असल्यामुळे त्याच्या नादी नको लागायचे म्हणून शेवटी वैष्णवीची शाळा बंद झाली.आपण गरीब आहोत कशाला कोणाशी वैर घ्यायचे म्हणून वडिलांनी वैष्णवीला घरीच थांबायला सांगितले तरीही शेख अल्ताफ वैष्णवीचा पिच्छा करत घरापर्यंत येऊ लागला. शेवटी आई वडिलांना त्रास सहन होत नव्हता आपण पोलिसांना सांगितले तर बदनामी होईल म्हणून त्यांनी शेवटी वैष्णवीचे लग्न करायचे ठरवले.जालना शहरात नात्यातील चांगला मुलगा पाहून तीन दिवसापूर्वी मोजक्या नात्यावईकांच्या उपस्थित लग्न केले.लग्न झाल्यानंतर येती जाती साठी वैष्णवी माहेरी मंठा येथे आली होती. पुन्हा सासरा जायचे आहे म्हणून दिनांक 30/06/2020 रोजी दुपारी वैष्णवी,तिची आई व एक मैत्रीण रेश्मा वैष्णवीला साडी घेण्यासाठी मंठयाच्या मेन मार्केट मध्ये आल्या.साडी घेतल्यानंतर आई म्हणाली मी शिदोरीचा निरोप देऊन येते तुम्ही घराकडे जा.वैष्णवी व तिची रेश्मा नावाची मैत्रीण दोघी घराच्या दिशेने निघाल्या तेवढ्यात भर बाजारात शेख अल्ताफ शेख बाबू यांनी नवविवाहित वैष्णवीच्या गळ्यावर चाकूचे वार केले आणि पसार झाला वैष्णवी जाग्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडली. भरबाजारातील घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून आरोपीस अटक केली आहे.पोलीस आपल्या परीने योग्य तपास करत आहेत.पण घडलेला प्रकार आज महाराष्ट्राच्या मातीला काळिमा फासणारा आहे. वैष्णवी अशामती आईची एकुलती एक मुलगी होती.छोट्या शुभम भावाची बहीण होती.वडिलांची सर्वात प्रेमळ अशी मुलगी होती मग आपली कोण होती तर आपली ही बहीण होती. आमच्या पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्र राज्यात एकतर्फी प्रेमातून 


भरदिवसा अनेक हत्या होत आहेत आम्ही दोन दिवस हळहळ व्यक्त करून शांत बसतो.आपण समाज म्हणून आता सजग राहिले पाहिजे अशा घटना पुन्हा घडणार नाहीत यासाठी आपल्या आसपास होणारी प्रत्येक छोटी घटना अशा मोठ्या घटनेत रुपांतरीत होणार नाही याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. केवळ घटना घडल्या नंतर दुःख व्यक्त करण्यापेक्षा अशी घटना घडणार नाही यासाठी आम्ही सदैव सावधान राहून अशा गुंड वृत्तीच्या व्यक्तींना पोलिसांच्या ताब्यात दिले पाहिजे. अन्याय सहन केला तर आपणच गुन्हेगार होतो.


*जस्टीस फॉर वैष्णवी* 


      महाराष्ट्र ही संताची भूमी आहे. येथे असंख्य महापुरुष होऊन आपल्याला आदर्श देऊन गेले. त्यांनी आम्हास अन्याय सहन करू नका ,इतरांवर अन्याय करू नका ,जगा व जगू द्या हा जीवनाचा संदेश दिला. न्यायासाठी पण आपण कठोर होऊन न्याय दिला पाहिजे हा छत्रपती शिवरायांच्या आदर्श आमच्या समोर आहे.सामाजिक न्यायासाठी व स्रियांच्या सन्मानासाठी राजर्षी शाहू महाराज,महात्मा फुले,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले जीवन समर्पित केले.याच भूमीत राजमाता जिजाऊ,अहिल्यामाई होळकर यांनी आदर्श राज्यकारभार चालवून दाखवला आणि सावित्रीमाई फुले यांनी स्त्री शिक्षण व स्रियांच्या जीवनात क्रांती आणली.एक स्त्री मुलगी असते, बहीण असते,आई असते, पत्नी असते,आजी असते अशा विविध रुपात एक चारित्र्याचा आदर्श निर्माण करते. स्त्री कोणत्याही क्षेत्रात कमी नाही सर्व क्षेत्रात आपल्या कार्य कर्तृत्वाने स्त्रीयांनी आपले स्थान निर्माण केले आहे. पण आजही स्त्रियांवर अन्याय अत्याचार होत आहेत.एकतर्फी प्रेमातून भर रस्त्यावर तिला मारले जात आहे. हे मारणे एक स्त्रीचे मरण नाही तर असंख्य स्रियांचे प्रतिनिधित्व येथे मारले जात आहे.अशीच घटना मंठा शहरात भर दुपारी बाजरातपेठेत घडते. वैष्णवी नारायण गोरे या मुलीला एकतर्फी प्रेमातून गळ्यावर चाकूने वार केले जातात व जागीच ठार मारले जाते वैष्णवीला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे आणि पुन्हा अशा घटना घडणार नाहीत यासाठी आम्ही सदैव जागरूक राहिले पाहिजे. 


 


 


 *सर्वांनी वैष्णवीवर झालेल्या अन्याया विरुद्ध आवाज उठवला पाहिजे तिच तिला श्रद्धांजली ठरेल.*


*Justice for Vaishnavi*


COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group