मुंबई, दि. १ जुलै २०२०
स्व. चंद्रकांता गोयल यांच्या नेतृत्वात मातृत्वाचा अधिक प्रभाव होता, असे प्रतिपादन भूतपूर्व मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. स्व. चन्द्रकांता गोयल यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज भाजपा मुंबई तर्फे व्हर्च्युअल श्रद्धांजली सभा आयोजीत केली होती त्यात नागपूरहून सहभागी होताना ते बोलत होते.
त्यांनी पुढे सांगितले कि स्व. चंद्रकांताजी एक संघसमर्पित व्यक्तिमत्व होत्या, जेव्हा विधानसभेत यायच्या तेव्हा सर्वासाठी काही काही खाऊ घेऊन यायच्या. आपल्या मतदारसंघातली प्रश्रनावर त्या खूप संवेदनशील होत्या. त्यांना एकदा जो भेट तो त्यांना मम्मी म्हणूनच लक्षात ठेवायचा. माझ्या काकू शोभाताई फडणवीस यांच्यामुळे माझाही गोयल कुटुंबायांशी जवळून परिचय झाला. त्यांच्या मतदार संघातली लोक आजही त्यांची आठवण काढत असतात. त्यांचे पुत्र प्रदीपजी आणि पियूषजी आणि त्यांच्या कन्या आजही त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून चालत आहेत, ही समाधानाची बाब आहे.
श्री. पियूष गोयल यावेळी बोलताना म्हणाले की समाजसेवा करताना कधी त्यांनी घर कुटुंबाकडे दुर्लक्ष केले नाही. ९० च्या दशकात त्यांनी आपला पूर्ण आमदार निधी मतदारसंघात शौचालय बनविण्यासाठी वापरला होता. आज काम करताना तीच प्रेरणा समोर असते. ते पुढे म्हणाले कि मम्मी नेहमी कार्यकर्त्यांमध्ये सेतू चे काम करत होत्या. एकद विजय मिरवणूक संपल्यावर सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी स्वतःच्या हाताने बनवून जेऊ घातले होते. स्व. नानाजी देशमुख यांनी जो आदर्श घालून दिला, त्याप्रमाणे त्यांनी वयाच्या साठाव्या वर्षी राजकारणातून निवृत्ती पत्करली आणि पूर्णवेळ समाजकार्य सुरु केले.
मुंबई भाजपा अध्यक्ष श्री मंगलप्रभात लोढ़ा म्हणाले की स्व. चंद्रकांता गोयल या सर्वात जास्त वेळा निवडून आलेल्या महिला आमदार होत्या. पियूषजी आपल्याशी बोलताना म्हणाले कि आता आई नसल्याने मुम्बैतव यावे वाटत नाही अशी आठवण तसांगून ते म्हणाले कि भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांची स्व. चंद्रकांतांबें विषयी हीच भावना आहे.
श्री. प्रदीप गोयल म्हणाले की स्व.चंद्रकांता जी यांचे आम्हा मुलांच्या शिक्षणावर व्यवस्थित लक्ष होते. जर मार्क कमी पडले तर का कमी पडले याचा त्या व्यवस्थित उहापोह करीत. आम्ही मुलांनी रोज संघाच्या शाखेत जावे याचा आग्रह त्या धरीत.
भूतपूर्व राज्यपाल श्री. राम नाइक म्हणाले की जेंव्हा माझा अपघात झाला होता आणि मी गंभीर जखमी होऊन सायन हॉस्पिटल मध्ये पडलो होतो, तेव्हा माझे रोजचे जेवण चंद्रकांताबेन यांच्या घरून यायचे. अनेकदा पियूषजीच तो जेवणाचा डब्बा आणत असत.
रा.स्व. संघ कोंकण प्रान्त संघचालक डॉ. श्री. सतीश मोढ़ यांनी सांगितले की स्व.चंद्रकांताजी यांचा संघकार्यात मोठा सहभाग असायचा. त्यांचा परिवार संघाशी जोडलेला राहील याची त्या पुरेपूर काळजी घ्यायच्या. आपल्या आमदारकीच्या काळात त्यांनी आपला संपूर्ण आमदार निधी शौचालये बनविण्यावर खर्च केला होता.
मुंबई भाजपा मुख्यालय वसंत स्मृति इथून प्रसारित झालेल्या या व्हर्च्युअल श्रद्धांजलि सभेत भजन सम्राट श्री. अनूप जलोटा विशेषतवाने सहभागी झाले होते. त्यांच्या भजनाने कार्यक्रम सुरु झाला. या कार्यक्रमात श्री. देवेंद्र फडणवीस नागपुरहुन, श्री पियूष गोयल नवी दिल्लीतून व्हिडिओ कॉन्फरन्स ने सहभागी झाले होते. मुंबई भाजपच्या सभागृहात खासदार श्री. गोपाल शेट्टी यांच्यासमवेत विधान परिषद विरोधी पक्षनेते श्री प्रवीण दरेकर, आमदार श्री. तमिल सेलवन, मुंबई भाजपा चे भूतपूर्व मंत्री आ.श्री. आशीष शेलार, भूतपूर्व मंत्री श्री. प्रकाश मेहता, भूतपूर्व मंत्री श्री. राज के पुरोहित, आ. श्री. राहुल नार्वेकर, आ.श्री. प्रसाद लाड, आ. श्री.पराग अलवणी, श्री.महामंत्री अमरजीत मिश्रा, प्रवक्ता श्री.भालचंद्र शिरसाट सहभागी झाले होते. गोयल कुटुंबियांकडून श्री. प्रदीप गोयल उपस्थित होते.
मुंबई भाजप अध्यक्ष श्री.मंगलप्रभात लोढ़ा यांनी सूत्रसंचालन केले. भाजपा चे अनेक कार्यकर्ते व्हिडिओ कन्फरन्स द्वारा या कार्यक्रमात सहभागी झाले.
(मिलिंद दोंदे
प्रसिद्धी प्रमुख
98210 52259 )
COMMENTS