महा मारी चा सर्वात वाईट काळ यायचा बाकी असल्याचा इशारा गेब्रेसियोसिय यांनी दिला.

इशारा



  • जगभरात कोरोना महामारीमुळे हैराण झालेल्या नागरिकांना दुसऱया लाटेमुळे पुन्हा भयंकर परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहोनम गेब्रेसियोसिय यांनी सांगितले की, जगभरातील अर्थव्यवस्था पार कोलमडल्या आहेत. त्यामुळे या महामारीचा सर्वात वाईट काळ यायचा बाकी असल्याचा इशारा गेब्रेसियोसिय यांनी दिला. सरकारने त्वरित उपाययोजना केल्या पाहिजे, अन्यथा रुग्णसंख्येचा मोठा स्फोट होऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटनेला वाटते की, लवकर ही महामारी संपली पाहिजे. मात्र, अजून आपण खूप दूर आहोत.


 


जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 1 कोटी 5 लाख 13 हजार 558 कर पोहचला असून 5 लाख 8 हजार 250 रुग्ण दगावले आहेत. सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या अमेरिकेत 26 लाख 81 हजार 811 जणांना कोरोनाची लागण झाली असून, 1 लाख 28 हजार 783 रुग्णांचा मृत्यू झाले आहे. गेल्या 24 तासात अमेरिकेत 48 हजार नवे रुग्ण आढळले असून अनेक राज्यात हॉटेल्स, बार बंद ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत जगभरात 56 लाख 69 हजार 594 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, अनेक ठिकाणी लॉकडाऊन पून्हा लागू केला आहे. सौदी अरब राष्ट्रात उद्या बुधवार, 1 जुलैपासून सर्व धार्मिक स्थळे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.


टिप्पण्या