- युवकांना महीलाना रोजगार देण्यासाठी कृषी वर आधारित उद्योग मोठ्या प्रमाणात उभे करावेत :-प्राचार्य डॉ. भालचंद्र कराड
---------------------------------------
माजलगांव दि.(प्रतिनिधी ):-आजच्या धक्का क्षधकीच्या युगात युवकांना महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कृषी वर आधारित जे उद्योग आहेत ते उद्योग मोठ्या प्रमाणात उभे करावेत असे मत प्राचार्य डॉ. भालचंद्र कराड यांनी व्यक्त केले .
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी महाविद्यालय डोंगर शेळकी तांडा उदगीर च्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी कोरोना साथीला रोखण्यासाठी जे शासनाने नियम घालून दिले आहेत त्या नियमाचे पालन करून फुलेपिंपळगांव येथे दि.१ जुलै रोजी सकाळी १० वाजता आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून कराड बोलत होते.
या कार्येक्रमाचे अध्यक्षस्थान संरपच दशरथ उमरे यांनी भूषवले तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक रमेशराव वजीर,धम्मानंद साळवे,प्रज्ञाताई कांबळे,ढेपेताई,यांची उपस्थिती होती.
कोरोना साथी मुळे कृषी चे विद्यार्थी चैतन्य कोरडे,बालाजी सरवदे यांनी कृषी दिनाच्या निमित्ताने गांवात वृक्षारोपण करून बचतगटाच्या महीलाना विषमुक्त शेती कशी करावी यांचे मार्गदर्शन करत लिंबोळी अर्काचे प्रशिक्षण दिले
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील तरूण मित्रानी परिश्रम घेतले.
COMMENTS