अन्वित माजलगावकरला बेस्ट स्टुडंट पुरस्कार ------- माजलगाव,( प्रतिनिधी) फ्लाईंग बर्डस् अकॅडमीचा विद्यार्थी चि. अन्वित निलेश माजलगावकर या चिमु...
अन्वित माजलगावकरला बेस्ट स्टुडंट पुरस्कार
-------
माजलगाव,( प्रतिनिधी) फ्लाईंग बर्डस् अकॅडमीचा विद्यार्थी चि. अन्वित निलेश माजलगावकर या चिमुकल्यास शाळेच्या वतीने दिला जाणारा बेस्ट स्टुडंट अवाॅर्ड फाॅर जून 2020 देण्यात आला आहे.
सध्या कोरोनामुळे शाळा बंद असल्यातरी फ्लाईंग बर्डस् अकॅडमीच्या वतीने आॅनलाईन शिकवणी वर्ग घेण्यात येत आहेत. विद्याथ्र्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने शाळेच्या वतीने दरवर्षी विवीध पुरस्कार देण्यात येतात. यावर्षीचा बेस्ट स्टुडंट हा पुरस्कार दररोज शाळेचा युनिफाॅर्म, प्राॅपर म्यूट, अनम्यूट, क्लासवर्क, होमवर्क, सेंड प्राॅपरली या शाळेत राबविण्यात येणा-या उपक्रमात अन्वित निलेश माजलगांवकर या चिमुकल्या विद्याथ्र्याचा असलेला सहभाग लक्षात घेता त्याला हा पुरस्कार देण्यात आला आहे. या पुरस्काराबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
COMMENTS