वंचित बहुजन आघाडी चे शहराध्यक्ष भगवान कांबळे यांची मागणी
-- लॉकडाऊनच्या तीन महिन्याच्या कालावधीत आलेले विज बिल शासनाने माफ करावे. सर्व बिल माफ करता येत नसेल तर किमान 50 टक्के विज बिलाची रक्कम माफ करावी, अशी मागणी भारिप व वंचित बहुजन आघाडी चे शहराध्यक्ष भगवान कांबळे यांनी केली आहे. 50 टक्के विज बिल माफ करण्यासाठी त्यातील निम्मी विज बिलाची रक्कम म्हणजे 25 टक्के बिल विज कंपनीने माफ करावे.
लॉकडाऊनच्या काळात बहुतांश जनता घरीच असल्यामुळे दिवसाचे नऊ-दहा तास तत्सम इलेक्ट्रिक उपकरणे चालू असत. आता आलेले बिल हे लॉकडाऊनमधील तीन महिन्याचे आहेत. लॉकडाऊनमध्ये विजेचा वापर जास्त झाला. टीव्ही व फॅन यासारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर वाढला. उन्हाळ्यात विजेची मागणी वाढतेच. दुसरी गोष्ट म्हणजे MERC ने एप्रिलमध्ये विजेचे दर वाढवले आहेत. ते दर लागू झाले आहेत. मागील वर्षीच्या या महिन्याच्या बिलाची आणि यंदाच्या बिलाची तुलना करुन पाहिली तरीही हे विज बिल माफक आहे हे लक्षात येईल.
लॉकडाऊनच्या काळात विजेचा घरगुती वापर जास्त झाला आहे. शिवाय विजेचे दरही वाढले आहेत. त्यामुळे ग्राहकांना विजेचं बिल जास्त आलं आहे. लॉकडाऊनमध्ये घरगुती विजेचा वापर वाढला, बिलाचे हप्ते पाडून देऊ असे विद्युत वितरण कंपनी उपकार्यकारी अभियंता सुमित पांडे म्हणाले. आपण दिलेल्या निवेदनाचा विचार करून जुलै महिन्यात कोणाचेही विज कट (डिस्कनेक्ट) करणार नाही व आम्हाला वरून आदेश आला तर विज बील माफ करू पण कसलाही आदेश न आल्यास मात्र जनतेनी विज बिल स्वता येऊन भरावे जर कोणाला सर्व बिल भरणे शक्य होत नसेल तर आम्ही त्यांचे हप्ते पाडुन देखील देऊ असे ही ते म्हणाले.
धर्माबाद नगर पालिकेने स्थायी समितीमध्ये याबाबत ठराव करून 3 महिने वीजबिल किमान 50 टक्के माफ करण्यासाठी निर्णय घ्यावा असं निवेदनाव्दारे मुख्याधिकारी नगराध्यक्षा, उपाध्यक्ष व सर्व नगरसेवक यांना विनंती करण्यात आली आहे.पुढील 4 महिने थकबाकीमुळे कोणाचीही विज कापू नये, असे निवेदनात म्हणले आहे. निवेदनावर भारिप व वंचित बहुजन आघाडी चे शहराध्यक्ष भगवान कांबळे, तालुका अध्यक्ष गौतम देवके, गंगाधर हणमंते, जे के जोंधळे, मारोती कांबळे, चांदोबा वाघमारे,भीमराव जोंधळे, सदाम खान,अझरुद्दीन नझिरोद्दीन,उदयकिरण वाघमारे,मोईन शेख फरीद,अथरोद्दीन नजीरोद्दीन ,शेख मोईज, क्रांती सोनकांबळे, अजय कांबळे, राहुल शिरसे, संगीता वाघमारे आणि शेख रईस सह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
- ग्लोबल मराठवाडा न्यूजसाठी, अहमद लड्डा धर्माबाद.
COMMENTS