धर्माबाद (अहमद लड्डा ) कोरोना (कोव्हिड19) महामारीच्या पाश्र्वभूमीवर पिंपळगाव तालुका बिलोली येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. संयोजक
संतोष पाटील साखरे यांच्या वतीने हे रक्तदान शिबिराचे आयोजन
करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आरळी जि प सर्कलचे सदस्य लक्ष्मणरावजी ठक्करवाड, उपस्थित होते, तर उद्घाटक म्हणून नायगाव मतदार संघाचे भाजपा नेते बालाजी बच्चेवार,प्रमुख पाहुणे पंचायत समिती सदस्य दत्तरामजी बोधने,मेहत्रे साहेब,सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन सुधाकरराव पाटील कन्ने, बाजार समिती संचालक बाबाराव पाटील खेडे, बाबाराव पोलीस पाटील आदिची उपस्थित होती.
ग्रामीण भागात पहिल्यांदाच रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याने या शिबीरात पंचवीस रक्तदात्यानी रक्तदान केल्याने
मान्यवरांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
अभिजीत पाटील धरमुरे,अमोल पाटील माचनुरकर,गणेशभाऊ गुरुपवार,अभिमन्यु चव्हाण,राहुल पाटील ममदापुरकर व संतोष पाटील मित्र परिवाराच्या सर्व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.
COMMENTS