एसबीआय बँकेच्या कर्मचाऱ्यास कोरोना ची लागण सेलू (प्रतिनिधी ) सेलू शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतील कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण झाल्याने सेल...
- एसबीआय बँकेच्या कर्मचाऱ्यास कोरोना ची लागण
सेलू (प्रतिनिधी ) सेलू शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतील कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण झाल्याने सेलु शहरात एकच खळबळ माजली असून बँकेतील इतर कर्मचारी व अधिकारी घबराटीचे वातावरण पसरले आहे.
सेलू शहरातील स्टेट बँक ऑफ इंडीया शाखेचे अधिकारी यांना तब्येत बरोबर वाटत नसल्याने व कामाच्या ताणामुळे ते 27जून पासून रजेवर होते. ते परभणी येथे राहत असल्याने आणि त्यांची तब्येत बिघडली असल्याने, त्यांनी तपासणी केली असता ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे असल्याचे आढळून आले. सुदैवाने ते आठ दिवसापासून रजेवर असल्याने त्यांचा सोबत काम करणारे बँकेतील इतर अधिकारी व कर्मचार्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
रविवारी नगरपालिका तर्फे एस. बी. आई. बँक सैनीटाईझर ने निर्जंतुकीकरण करण्यात आले.तसेच एस. बी. आई. बॅंक मार्केट एरिया दि. 06 ते दि. 08 जुलै 2020 रोजी बंद राहणार आहे.
COMMENTS