महात्मा बसवेश्वर निवासी संस्कार बालक आश्रम मध्ये वर्धापन दिन साजरा.
धर्माबाद (अहमद लड्डा) राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर प्रतिष्ठाण महात्मा बसवेश्वर निवासी संस्कार बालक आश्रम धर्माबाद या आश्रमातील बारावा वर्धापन दिन शनिवारी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद राजवाडी पिंपळगाव, तालुका हदगाव चे गुरुवर्य बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार दत्तात्रय शिंदे, धर्माबाद पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सोहन माछरे, पोलिस उपनिरीक्षक नागनाथ सनगल्ले, माजी नगराध्यक्ष व सध्याचे उपाध्यक्ष विनायकराव कुलकर्णी, आणि नगरसेवक भोजराज गोनारकर, हे होते. ह्या कार्यक्रमाला शिवा संघटनेचे तालुका अध्यक्ष आबासाहेब पाटील बन्नाळीकर,शिवा कर्मचारी जिल्हा महासंघ चे अध्यक्ष विरभद्र बसापुरे व शिवा संघटना जिल्हा उपाध्यक्ष संदीप पाटील जावळेकर उपस्थीत होते. सर्व पाहुण्यांचे आश्रमाचे संचालक, महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त किर्तनकार श्री मोहन कावडे हसनाळीकर महाराज (गुरुजी) यांनी स्वागत केले. ह्या कार्यक्रमात पंचक्रोशीचे भक्त ही उपस्थित होते. जे विद्यार्थी ह्या आश्रमात राहतात, त्यांची सर्व व्यवस्था श्री.कावडे महाराजांच्या कीर्तनरूपी मानधना द्वारे चालविली जाते आणि आतापर्यंत शासनातर्फे आश्रमास कांहीच मदत मिळाली नाही. तरी ह्या आश्रमासाठी शासनाकडून आर्थिक मदत मिळावी ही अपेक्षा आहे.
COMMENTS