सेलू : येथील नूतन विद्यालयात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती कृषीदिन व आषढी एकादशी निमित्त बुधवार ( ता.०१ ) रोजी वृक्षारोपण करण्यात आले. प्रथमतः श्री विठ्ठल व हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रशालेतील संगीत शिक्षक सच्चिदानंद डाखोरे यांनी ' वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी ' हा अभंग गायला. अव्दैत पाटील व अर्जुन शहाणे या सहावीतील विद्यार्थ्यांना मोफत शालेय पुस्तकं देण्यात आली. या कार्यक्रमात स्वराज सोंजे, देवांशी सुभेदार हे विठ्ठल -रुक्मिणी तर शौर्य फटाले हा विद्यार्थी वारकरी झाला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल कुलकर्णी यांनी प्रस्तावित केले. सुञसंचालन सुरेश हिवाळे यांनी तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक रामकीशन मखमले यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक रघुनाथ सोन्नेकर, ग्रंथपाल बालासाहेब निरस, शिक्षक प्रतिनिधी संतोष मलसटवाड, अनंतकुमार विश्वंभर , संतोष पाटील, काशिनाथ पल्लेवाड, गणेश माळवे, सुधीर जोशी यांनी प्रयत्न केले.
COMMENTS