- मुख्याधिकारी ने दिले तातडीने साफसफाईचे आदेश
- शहरात मुख्याधिकारी यांचे होत आहे कौतुक
रत्नाळी ते शंकरगंज व शंकरगंज ते साईबाबा मंदिर च्या रस्त्यावर ज्या नगर पालिकेचे नाल्या आहेत. त्या नाल्यात सलग दोन-तीन दिवसांच्या पावसामुळे, संपूर्ण शंकरगंज मधील नाल्या तूडुंब भरून नाल्यातील घाणेरडे पाणी रस्त्यावर साचले होते व नाल्यांतीळ चिखल रस्त्यावर आल्यामुळे पूर्ण रस्ता चिखलमय झाला होता. ह्यामुळे पूर्ण शंकरगंज परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले होते यातच डास वाढत असताना आरोग्यावर परिणाम होण्याची चिन्हे दिसत होती. ही बाब लक्षात येताच शिवसेनेचे तालुका प्रमुख श्री गणेश गिरी यांनी तातडीने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री मंगेश देवरे यांच्याशी संवाद साधून साफसफाई साठी सूचना केल्या. श्री गिरी यांच्या सल्ल्यावर श्री.देवरे यांनी कांहींही उशीर न करता, साफसफाईसाठी त्वरित सूचना दिल्या व आज बुधवारी १ जुलै रोजी क्रेनच्या सहाय्याने सर्व नाल्यांची साफसफाई केली गेली आहे. सर्व परिसर चकचकीत करण्यात आला आहे. मुख्याधिकारी श्री मंगेश देवरे यांनी सर्व धर्माबाद शहराच्या स्वच्छतावर नजर ठेवून आहेत. श्री. देवरे दररोज सर्व प्रभागात जाऊन स्वतः पाहणी करतात. शहर स्वच्छ झाल्यानंतरच त्यांच्या कार्यालयात येतात. या कारणास्तव, मुख्याधिकारी श्री मंगेश देवरे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. शंकरगंज येथील सर्व नाल्यांची सफाई करते वेळेस शिवसेना तालुका प्रमुख श्री गणेश गिरी सोबतच शिवसेना शहर प्रमुख अनिल कमलाकर, साईनाथ पेकमवार, राजू पटकोटवार, लखन, अशोक घाटे, संजय उमडे सर आणि शिव पाटील उपस्थित होते.
--- ग्लोबल मराठवाडा न्यूजसाठी ,अहमद लड्डा धर्माबाद.
COMMENTS