🏀जागतिक टेनिसव्हॉलीबॉल दिनानिमित्त
सेलू ( प्रतिनिधी ) कोरोनाच्या प्रादुर्भाव मुळे व सोशल डिस्टींग राखून, टेनिसव्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशन वतीने 16जुलै रोजी जागतिक टेनिसव्हॉलीबॉल दिन व खेळाचे जनक डॉ. व्यंकटेश वांगवाड यांच्या जन्मदिना निमित्ताने , 11 जुलै (शनिवार) रोजी सांय. 4 ते 5 वा. पर्यंत ऑनलाईन लिंक वरून राज्य टेनिसव्हॉलीबॉल पंच परीक्षा व 12 जुलै रोजी सकाळी 10 वा. गुगल मिंट वर मुलाखती चे आयोजन करण्यात आले आहे.
राज्य पंच परीक्षेच्या अधिक माहितीसाठी राज्य सहसचिव गणेश माळवे (9423324907), रेफरी बोर्ड समितीचे चेअरमन प्रफुल्लकुमार बन्सोड (97300 16017 ) सदस्य डॉ. दशरथ देसिंगे, मनोज मस्के, सतिश नावाडे यांच्या शी संपर्क साधावा. राज्य ऑनलाईन पंच परीक्षा नावनोंदणी ची अंतिम तारीख 9 जुलै सांय. 4:00 वा . पर्यंत करावी.
16 जुलै रोजी गुगल मिंट वर जागतिक टेनिसव्हॉलीबॉल दिन व डॉ. वांगवाडसर यांच्या जन्मदिन कार्यक्रमात राज्य पंच परीक्षा निकाल जाहीर होणार आहे. राज्य पंच परीक्षेस राज्यभरातून खेळाडू , प्रशिक्षक, क्रीडा शिक्षक यांनी सहभागी व्हावे असे आवाहन राज्य उपाध्यक्ष खा.संजय जाधव,जनक टेकाळे, गणपतराव बालवडकर, अशोक दुधारे, प्रा.नंदकुमार देशपांडे, राज्य सचिव आनंद खरे, किशोर चौधरी, दिनेश शिगाराम, डॉ. आबासाहेब शिरसाठ,यांनी केली आहे.
COMMENTS