▪️धर्माबाद (अहमद लड्डा)▪️
धर्माबाद तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन थर्मल स्कॅनिग व आक्सिपल्स मिटर च्या सहायाने सर्व नागरीकांची आॅक्सिजन सह कोरोना टेस्ट करण्यात यावी ह्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष श्री दत्तात्रय कावडे यांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन विनंती केली आहे.
वरील विषयास अनुसरीन निवेदन सादर करण्यात आले की धर्माबाद शहरासह ग्रामीण भागात देखील कोरोना चा शिरकाव झाल्यामुळे धर्माबाद तालुक्यातील सर्व ग्रामीण भागातील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या सर्व बाबीचा विचार करुन व ग्रामीण भागात हे महामारी आपले पाय पसरु नये या अनुशंगाणे धर्माबाद प्रशासनाच्या वतीने या सर्व चाचण्या प्रत्येक गावात जाऊन करुन कोरोना माहामारी थांबवण्यासाठी उपाय योजना लवकर मलात आणाव्या व तसेच ग्राम विकास मंत्री यानी 23 मार्च रोजी जीआर काढले असुन त्या जीआर मध्ये 14 व्या वित्त आयोगाची या वर्षिची निधी कोरोना प्रतिबंधात्मक व आरोग्य विषयक साधनावर खर्च करण्याचे व अर्सोनिक अल्बम 30 च्या गोळ्या सर्व ग्रांमपंचायती मार्फत वाटप करण्याचे सांगीतले असताना सुद्धा धर्माबाद तालुक्यातील काही गाव वगळता हे उपक्रम कुठेही राबले गेले नाही ते तत्काळ सर्व ग्राम पंचायतीत राबवावे हे आदेश द्यावे अशी विनंती मनसे धर्माबाद तालुका अध्यक्ष श्री दत्तात्रय कावडे यांनी तहसीलदार कडे केली आहे.
COMMENTS