- - गट ई कामगारांना व्यवसायात आर्थिक मद्दत १०हजार रु.अनुदान द्या - नानासाहेब घोडके
माजलगाव (प्रतिनिधी)
कोरोना महामारीच्या संभाव्य धोक्या पासून प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून टाळेबंदीला जवळपास चार महिने होत आहेत आणि त्यामुळे मोठ्या व्यावसायिकां सह छोटे छोटे लहान व्यावसायिकांना आर्थिक झळा सोसाव्या लागत आहेत. यापैकी रस्त्यावर बसून लोकांच्या चप्पला, बुटे शिवुन ,दुरुस्ती करुन त्यातून होणाऱ्या कमाईवर उपजीविका भागवणाऱ्या गट ई कामगारांना उपासमारीची वेळ आली आहे. कारण सध्याच्या परिस्थितीत तुटलेली चप्पल शिवायला लोक मजूरी ची चौकशी करतातहेत आणि चप्पल, बुटांची पॉलीस तर लोक विसरून गेले आहेत. लग्न सराईत ग्रामीण भागातील अनेक जण नवरी,नवदेवांना बांधून घेतलेल्या चप्पल, बुटांची मागणी असते पण थाटामाटात होणाऱ्या लग्न सोहळ्यांवर बंदी घालण्यात आल्यामुळे कच्च्या मालाची खरेदी करून गुंतवणूक करणारे कारागीर धंदाच झाला नसल्याने ते कर्जबाजारी झाले आहेत. सर्व बाजुने व्यवसायात मोठी आर्थिक मंदीची लाट आल्याने बिकट परिस्थिती निर्माण झाली असल्याचे सांगत त्यांना शासनाने १० हजार रुपये प्रति सानुग्रह अनुदान द्यावे. अशी मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे बीड जिल्हा अध्यक्ष नानासाहेब घोडके यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. याबाबत पत्रकात म्हटले आहे की, सदरील कामगारांची रोजीरोटी सह कुटुंबातील सदस्यांचे आजारपण, मुला-मुलींच्या शिक्षणाचा खर्च अवलंबून असतो याबाबत माजी समाज कल्याण मंत्री तथा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबनराव घोलप यांनी १० जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन सविस्तर माहिती दिली आहे. तर या संदर्भात बबनराव घोलप यांच्या आदेशावरुन राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने १४ जुलै रोजी राज्यातील सर्व जिल्हा अधिकारी यांना निवेदने देण्यात आली आहेत. सध्याच्या परिस्थितीत बीड जिल्ह्यातील कामगारांना दररोज होणारी कमाई जास्तीत जास्त १००रु.च्या वर नाही. म्हणून या सर्व प्रकारच्या आर्थिक परिस्थितीने खालावले असल्याने शासनाने सहानुभूती दाखवून गट ई चर्मकार कुटुंबांचे
सर्व्हेक्षण करून प्रती कुटुंब १० हजार रुपये प्रमाणे महाराष्ट्र शासनाने सानुग्रह अनुदान देण्यात यावे. अशी मागणी जिल्हा अध्यक्ष नानासाहेब घोडके यांनी केली आहे.
COMMENTS