धर्माबाद (अहमद लड्डा) धर्माबाद क्रीड़ा संकुल चे काम प्रगती पथावर असून ते लवकरच पूर्ण होईल, अशी ग्वाही तालुका क्रीड़ा अधिकारी श्री किशोर पाठक यानी पत्रकाराशिं बोलताना सांगितले. 200 मीटर ट्रैक तयार करण्याच्या मार्गदर्शन करण्यासाठी व मैदानाची पाहणी करण्यासाठी ते नांदेड़ क्रीड़ा अधिकारी कार्यालयाहुन धर्माबाद ला आले होते. त्यांच्या सोबत नांदेड़ जिल्हा एथेलेटिक्स असोसिएशन चे सचिव प्रलोभ कुलकर्णी, सेवा निवृत्त क्रीड़ा शिक्षक डॉ पंढरीनाथ थोटे,राष्ट्रीय खेळाडू शेख शब्बीर,राष्ट्रीय खेळाडू संतोष आनेराय, अभियंता दिलीप मनुरकर, नांदेड़ चे एथेलेटिक खेळाडू निलेश खराटे, होमगार्ड कर्मचारी व महिला खेळाडू दिपा बड्डावार आणि तालुका क्रीड़ा संयोजक अहमद लड्डा हे होते. मैदानाच्या गुत्तेदारचे भाऊ श्री इफ्तेखार यानी मैदानावर झालेल्या सर्व कामाची माहिती देउन पुढील कामा संदर्भात श्री पाठक सरां कडुन सूचना घेतल्या. श्री पाठक यानी मैदानाची पाहणी करतेवेळी धर्माबाद चे प्रसिद्ध उद्योजक श्री सुबोध काकाणी, राष्ट्रीय खेळाडू डॉ अनिल रत्नाळीकर, व्यापारी प्रकाश गुजराथी, नगर सेवक संजय पवार, नगर सेवक वर्णी नागभूषण, अभियंता गोविंद झंवर, स्थानिक खेळाडू उमेश राठी व नितिन गुजराथी यानी भेट घेतली व काही सूचना दिल्या. सध्या ह्या धर्माबाद क्रीड़ा संकुल चे काम प्रगती पथावर असून पेवेलियनचे रंग रंगोटी, फर्शी व लाइट फिटिंग चे काम सुरु असून पूर्ण मैदान पंधरा दिवसात तयार होईल अशी अपेक्षा आहे.
COMMENTS