*रास्त भाव धान्य दुकानदारांना विमा कवच आवश्यक*
- खा.प्रतापराव पाटील चिखलीकर
नांदेड प्रतिनिधी 3 jun. 2020
जिल्हा तील रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने अशोक जयवंतराव एडके जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आज खा.श्री.प्रतापराव पाटील चिखलीकर यांना राज्यातील रास्त भाव धान्य दुकानदार यांना विमासंरक्षण मिळावे यासाठी निवेदन देण्यात आले,यावर मा.खासदार महोदयांनी मागणी योग्य असुन रास्त भाव धान्य दुकानदारांनी टाळेबंदी आणि उन्हाच्या तडाख्यात अत्यंत जोखमीत अनेक अडचणींचा सामना करीत धान्य वाटप केले आहे हि निश्चितच अभिमानाची बाब असल्याचे नमुद केले.याच बरोबर त्यांनी धान्य वितरण करताना स्वतःची आणि सोबत काम करणाऱ्यांची काळजी घेण्यासही सुचवले.
रास्त भाव धान्य दुकानदार आणि त्यांच्या मदतनिसांना विमासंरक्षणा बाबत मा.मंत्री महोदयांसोबत चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे.या वेळी अशोक गायकवाड,जेष्ठ उपाध्यक्ष,शाहुराज गायकवाड, राज्य सहसचिव, बळवंत सुर्यवंशी, उपाध्यक्ष, म.मुजाहेद,शहराध्यक्ष
आणि अनिल पुरुषोत्तम कुलकर्णी जनरल सेक्रेटरी हे उपस्थित होते.
COMMENTS