*मुख्यमंत्री सहाय्यता निधीत लातूर येथील मुस्लिमांकडून 1 लाखाचा निधी*
लातूर -प्रतिनिधी
देशासह राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रूग्णांत भर पडत आहे. अनेक ठिकाणी लोक अडचणीत सापडले आहेत. गेली 2 महिन्यापासून सर्व नागरिक हालाखीच्या परिस्थितीत अडकले आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी सामाजिक जबाबदारी पाळत लातुरातील मुस्लिम समाजातर्फे रमजान ईदचे औचित्य साधून 1 लाखाचा निधी जमा करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यात आला.
या निधीचा धनादेश लातूरचे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. आजपर्यंत राज्यभरात 70 हजारांपेक्षा अधिक रूग्ण कोरोनास आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी अनेक प्रतिबंध, सुचना करत लॉकडाऊन घोषित करण्यात आले. त्यामुळे देशासह राज्यातील सर्वच क्षेत्रावर त्याचा परिणाम पडला आहे. लातुरातील मुस्लिम समाजातर्फे लॉकडाऊन काळात सर्वच समाज घटकापर्यंत जीवनावश्यक वस्तु अन्न धान्य तसेच ईदचे साहित्य पोहोचविण्यात आले. व मुस्लिम समाजातर्फे सर्वांना काळजी घ्या असे संदेश देण्यात आले.
सौजन्य *अब्दुल समद शेख* पत्रकार
COMMENTS