- ----------------------------------------
*तत्काळ सुरू करण्याचे आ.प्रकाश सोळंके यांना निवेदन*
----------------------------------------
माजलगांव प्रतिनिधी
माजलगावा शहरामधुन खामगांव -पंढरपुर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 चे काम आर्धवट सोडून गुत्तेदार गेल्यामुळे रस्ताच्या बाजुची नाली बाधंकाम राहील्यामुळे सदरील व्यापारी याच्यां दुकानात पाणी जात असल्याने व्यापाऱ्यांची डोके दु:खी वाढली आहे.
तात्काळ गुत्तेदाराला आदेश देऊन बाधकांम सुरू करण्याचे निवेदन आमदार प्रकाश सोंळके यांना व्यापारी महासंघाने दिले आहे.
बीड जिलातील माजलगांव शहरामध्ये राष्ट्रीय महामार्ग गेल्यामुळे व्यापारी सह नागरिका मध्ये समाधान होते. परंतु रस्तातील दोन्ही बाजुच्या नाली बाधंकाम सदरील गुत्तेदाराने न करता अर्धवट सोडुन गेल्यामूळे दोन्ही बाजुचे पाणी व्यापारी याच्यां दुकानात कालच्या पावसाने शिरले.पावसाचे पाणी दुकानात शिरल्यामुळे व्यापारी वर्गाचें लाखोचे नुकसान होत आहे. व्यापारी महासंघाने अभियंता याच्यां कार्यालयास वेळा निवेदन देऊन ही निवेदनाला केराची टोपली केली आहे. निवडणुकीच्या वेळी आमदार प्रकाश सोंळके यांनी व्यापारी महासंघ यांना आश्वासन दिले होते की, आपन गुत्तेदाराकडुन आर्धवट राहीलेले काम व नालीबाधंकाम पुर्ण करून घेऊ आता पावसाळा सुरू झाला आहे. पण आज ही नालीबाधंकाम चे काम सुरू झाले नाही लवकरात लवकर नालीबाधंकाम सुरू करण्याचे आमदार प्रकाश सोळंके यांनी नगरपालिका प्रशासन व गुत्तेदार यांची बैठक घेऊन त्यानां काम सुरू करण्याचे आदेश द्यावे आसे निवेदन व्यापारी महासंघ अध्यक्ष सुरेंद्र रेदासनी व महासचिव सुनील भांडेकर,मार्गदर्शक अंनतदादा रूद्रवार,जेष्ठ व्यापारी रामेश्वर टवाणी व धंनराज बंब,संतोष आब्बड,बाजार समिती चे व्यापारी संचालक प्रभाकर होके,शशिकिरन गडम,मोहन घुले गणेश लोहिया, सल्लाऊदिन शेख,जफर मिर्झा,सत्यानारायण बाहेती, हिरालाल लोंढा व्यापारी यानीं दिले.
----------------------------------------
*मालाची नुकसान भरपाई*
----------------------------------------
माजलगांव शहरातील ज्या ज्या व्यापारीबाधंवाच्या दुकानात पाणी घुसुनमालाचे नुकसान होईल, त्या व्यापारी बाधंव यानां नुकसान भरपाई द्यावी, राष्ट्रीय महामार्ग अभियंता कार्यालय जालना याच्यांकडे व्यापारी महासंघ मागणी करणार
COMMENTS