- धर्माबाद येथे कॉंग्रेसच्या पक्षाच्या वतीने पत्रकारांचा सत्कार
धर्माबाद (प्रतिनिधी)
धर्माबाद मध्ये शासकीय विश्रामगहात कॉंग्रेसचे नेते श्री.राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त धर्माबाद मधील सर्व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. कोरोना साथीच्या महामारीत, स्वत: आणि स्वतःच्या कुटुंबाची पर्वा न करता, समाजात पत्रकारीतेतून दररोज, त्यांच्या वर्तमानपत्राच्या बातम्यातुन समाजाला जागरूक करण्याचा काम पत्रकारांनी केला आहे आणि हे कार्य उल्लेखनीय आहे. असे कॉंग्रेसचे युवा नेते श्री. ताहेर पठाण यांनी आपल्या प्रास्ताविकात म्हणाले. या कार्यक्रमास कॉंग्रेस तालुका अध्यक्ष श्री दत्ताहरी पाटील चोलाखेकर, काँग्रेस सोशल मीडिया चे रुद्र पाटील, बंडू पाटील बाभळीकर आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री गोविंद पाटील रोशनगावकर हे उपस्थित होते. प्रस्तावना नंतर सर्व पत्रकारांना शाल, नारळ, पुष्पहार व प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ पत्रकार संजय कदम, लक्ष्मण तुरेराव, बहुभाषिक पत्रकार संघाचे अध्यक्ष माधव हणमंते, गंगाधर धडेकर, कृष्णा तिम्मापुरे, पोतन्ना लखमावाड, सतीश पाटील शिंदे, अहमद लड्डा, भगवान कांबळे, सुरेश घाळे, पंडित पाटील जाधव, डोईवाड, बालाजी बकवाड व शेख खदीर उपस्थित होते. सतीश पाटील शिंदे यांनी पत्रकारांच्या वतीने आपले विचार मांडले.
----- ग्लोबल मराठवाडा न्यूजसाठी,
अहमद लड्डा, धर्माबाद
COMMENTS