- *राजस्थानी मल्टिस्टेट चा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा*
*गंगाखेड (प्रतिनिधी)*
शहरातील डॉक्टर लेन परिसरात असलेली राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड परळी वैजनाथ चा प्रथम वर्धापन दिन दिनांक 28 जून रोजी उत्साहात साजरा करण्यात आला . याप्रसंगी कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंग, सॅनिटायझर, मास्क या सर्व नियमांचे विशेष पालन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष चंदूलाल बियाणी,उपाध्यक्ष बालचंद लोढा, सचिव बद्रीनारायण बाहेती, माहेश्वरी सभेचे जिल्हा उपाध्यक्ष तथा पत्रकार गोपाळ मंत्री व संचालक मंडळ यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेच्या गंगाखेड शाखेने द्वितीय वर्षात यशस्वी पदार्पण केल्याबद्दल व खातेदारांनी शाखेला दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल संचालक मंडळाने शाखेच्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. यावेळी उपस्थित खातेदारांचे तथा प्रमुख पाहुण्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले .या प्रसंगी संस्थेचे कार्यकारी अधिकारी कुलकर्णी व्ही. बी. ,जनरल मॅनेजर सौ.मुंदडा ए.ए.,विकास अधिकारी कुलकर्णी पी. जी., कायदेशीर सल्लागार ऍड. मार्तंड शिंदे, शरद पाटसकर, रामदास काकडे, ,आय.टी.विभाग प्रमुख अनंत भाग्यवंत ,कर्ज विभागाचे प्रदीप मुरकुटे ,अमोल रापतवार , व गंगाखेड शाखाधीकारी भोसले ए.व्ही.,कर्मचारी उदावंत जी. पी., चाफळे डी. डी.,एडके जी.सी .तसेच दैनंदिन ठेव प्रतिनिधी भिसे डी. ए. व अंबुरे आर. डी. उपस्थित होते.
COMMENTS