- परभणी जिल्ह्यात काेराेना चे चार रुग्ण आढळले
सेलू. (किशोर कटारे )
परभणी जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या वाढत असून आज एका दिवसात परभणी जिल्ह्यात चार रुग्णांची वाढ झाली आहे. यात परभणीचे दोन तर जिंतूर आणि सोनपेठ यांचा देखील समावेश आहे. यामुळे आता परभणी जिल्ह्याचा करोना पॉझिटिव रुग्णांचा आकडा 109 वर जाऊन पोहोचला आहे. तर जिल्ह्यात सध्या पंधरा रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
परभणी जिल्हा रुग्णालयाला 28 जून रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये शहरातील गव्हाणे चौक येथील एक महिला व गंगापुत्र नगर कॉलनी येथील जिल्हा रुग्णालयातील एक्स-रे विभागातील एक कार्यरत कर्मचारी सोनपेठ शहरातील राज गल्ली येथील एक व्यक्तीला आणि जिंतूर शहरातील टिपू सुलतान परिसर येथील एका व्यक्तीला करोना ची लागण झाल्याचे समोर आले आहे.
आता परभणी जिल्ह्यात देखील करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्यातील प्रशासन देखील कडक पावले उचलत असून आता मास्क न घालणाऱ्या वर परभणी जिल्ह्यात कडक कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी आता प्रशासनाला सहकार्य करावे आणि आपल्या जिल्ह्यातील कोणाची संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करावा.
COMMENTS