कीटकनाशक क्षेत्रात चीनची मक्तेदारी शेतकरी संपवू शकतो.: श्री दिपक मोरताळे

कीटकनाशक क्षेत्रात चीनची मक्तेदारी शेतकरी संपवू शकतो.: श्री दिपक मोरताळे कीटकनाशके आपण मोठ्या प्रमाणात चीन कडून आयात करतो ,चीन आपल्या शेतकऱ...

कीटकनाशक क्षेत्रात चीनची मक्तेदारी शेतकरी संपवू शकतो.: श्री दिपक मोरताळे


कीटकनाशके आपण मोठ्या प्रमाणात चीन कडून आयात करतो ,चीन आपल्या शेतकऱ्यांना गिनीपिग समजून त्यांनी तयार केलेले व्हायरस आपल्या शेतात सोडतो आहे. त्या व्हायरस चा वापर करून तो शेतकऱ्यांची अब्जावधी ची लूट करतो.हे आपण थांबवू शकतो. नैसर्गिक कीटक नाशके आपण स्वतः तयार करू शकतो.


1. निमास्त्र : 1 एकरसाठी 


200 लि.पाणी + 20 लि.देशी गार्इचे गोमुत्र + 2 कि. देशी गार्इचे शेन + 10 कि. कडुलिंबाचा पाला फांदया सकट किंवा 10 कि. लींबोळी पावडर


नोट:लिंबाचा पाला मिक्सरमधून बारीक करून घेऊ नये. पाला नेहमी वरवंटा किंवा खलबत्या मधे वाटून चटणी करून घ्यावी.


नोट :निमास्त्रा मध्ये अतीरीक्त पाणी टाकू नये. तयार झालेले द्रावण तसेच फवारावे.


हे मिश्रन एकत्र करा व चांगले ढवळा व 48 तासांकरिता सावलीत गोणपाट झाकून ठेवा. दिवसातून दोनदा ढवळा. 48 तासांनंतर कपडयाने गाळून घ्या व सावलित साठवून ठेवा किंवा वापर करा.


निमास्त्राचा उपयोग रसशोषक कीडी पांढरी माशी, मावा, तुडतुडे व लहान आळयाया साठी होतो निमास्त्राने मोठी आळी मरत नाही


हे निमास्त्र 6 महिने वापरता येतो.


 


2. ब्रम्हास्त्र:


मोठया आळीसाठी


20 लि.देशी गार्इचे गोमुत्र + 2 कि. कडुलिंबाचा पाला फांदया सकट चटणी


+ 2 कि. कंरजीच्या पानाची चटणी + 2 कि. शिताफळाच्या पानाची चटनी


+ 2 कि. येरंडीच्या पानाची चटणी + 2 कि. धोतरयाच्या पानाची चटणी


ह्या चटण्या टाका व चांगले ढवळा. वर झाकण ठेवा व उकळून घ्या. सतत 4 उकळया येऊ दया. आचेवरून खाली ठेवा व 48 तास थंड होऊ द्या . दिवसातून दोनदा ढवळा व झाकून ठेवा.


48 तासा नंतर गाळून घ्या व साठवून ठेवा अथवा वापर करा. हे द्रावण 6 महिन्या पर्यंत चालेल.


1 ऐकर साठी प्रमाण


200 लि. पाणी + 6 लि. ब्रम्हास्त्र


3. अग्नीअस्त्र : हे बोंड आळी, घाटी आळी साठी


20 लि.देशी गार्इचे गोमुत्र + 2 कि. कडुलिंबाचा पाला फांदया सकट चटणी


+ 500 ग्रॅम तंबाखू + 500 ग्राम तिखट हिरवी मिरचीचा ठेचा + 250 ग्रॅम गावरानी लसणाची चटणी


हे मिश्रन ढवळून घ्या व त्यावर झाकण ठेवा व 4 उकळया येउ दया. 48


तास थंड होऊ दया व दिवसातून दोन वेळा ढवळा. 48 तासानंतर फडक्याने गाळून घ्या व सावलीत साठवून ठेवा.हे द्रावण 3 महिन्या पर्यंत वापरता येईल.


फवारणी प्रती एकरी


200 लि. पाणी + 6 ते 10 लि. अग्नीअस्त्र


 


4. दशपर्णी अर्क :


200 लि.पाणी + 20 लि.देशी गार्इचे गोमुत्र + 2 कि..ताजे देशी गार्इचे शेन + 200 ग्रॅम हळद पावडर + 500 ग्रॅम आद्रकाची चटणी


हे मिश्रन चांगले ढवळा, व गोनपाट झाका व रात्रभर ठेवा.


दुसऱ्या दिवशी सकाळी त्या मिश्रनात 10 ग्रॅम हिंग पावडर + 1 कि. तंबाखू पावडर + 1 कि. तिखट हिरव्या मिरच्याची चटनी + 500 ग्रॅम गावरानी लसनाची चटनी टाका व पुन्हा ढवळा व गोनपाट झाका व रात्रभर ठेवा.


तिसरया दिवशी सकाळी त्या मिश्रणात


2 कि. कडुलिंबाचा पाला फांदया सकट चटणी + 2 कि. करंजी ची पाने +


2 कि. सीताफळाची पाने + 2 कि. धोतऱ्यायाची पाने + 2 कि. येरंडीची पाने + 2 कि. बेलाची पाने फुलासकट + 2 कि. तुळशीची पाने मंजीरीसकट + 2 कि. झंडुचे पंचाग ह्यात पान फुले देठ व मुळया + 2 कि.निरगुडीची पाने + 2 कि. टनटनी वा घानेरीची पाने व फांदया सकट + 2 कि. गावरान पपर्इची पाने + 2 कि.आंब्याची पाने + 2 कि.गुळवेलीचे तुकडे + 2 कि. ऋचकी ची पाने + 2 कि. कन्हेरिचे पाने + 2 कि. बाउचीच्या फांदया + 2 कि. तरोटयाची पाने + 2 कि. आघाडयाची पाने + 2 कि. शेवग्याची पाने + 2 कि. कंबरमोडी + 2 कि.जास्वंदाची पाने + 2 कि.डाळिंबाची पाने + 2 कि. हराळी


 


ह्यापैकी कोणतेहि 10 झाडाची पाने परंतु पहिले 5 झाडाची पाने आवश्यकच आहेत.सगळी पाने मिसळा व 40 दिवसांपर्यंत आंबू द्या व दिवसातून एकदा ढवळा. ढवळताना नाकाला कापड बांधा. 40 दिवसानंतर कापडाने गाळून घ्या व सवलीत साठवून ठेवा. हे अर्क 6 महिन्या पर्यंत वापरता येईल .


फवारणी प्रती एकरी प्रमाण


200 लि. पाणी + 6 ते 10 लि. दशपर्णीअर्क


बुरशी नाशके : 


1. 200 लि. पाणी + 20 लि.गाळलेले जीवामृत


2. 100 लि.पाणी+5ते6लि.आंबटताक आंबट ताक हे बुरशी नाशक, विषाणू नाशक, संजीवक व जंतूरोधक आहे.


3. 5 कि. रानगौरी मोगरीने बारिक करा, एका फडक्यामध्ये गाठडी बांधा व त्याला एक दोरी बांधा. एक मजबूत काडी घ्या व त्या दोरीचे टोक काडीला बांधा व 200 लि. पाण्यात बुडवून ठेवा. 48 तासांनंतर पाण्यातून गाठडी बाहेर काडा व पिळून घ्या. ही कृती 3 ते 4 वेळेस करा. त्यानंतर पाणी ढवळून घ्या व फवारणीसाठी वापरा.


4. ऐका भांडयामध्ये 2 लि. पाणी घ्या, त्या मध्ये 200 ग्रॅम सुंठ पावडर टाका व चांगले ढवळून घ्या व झाकन ठेवून त्या द्रावनाला ऊकळा.द्रावनाला आर्धे होर्इ पर्यंत त्याला ऊकळा व थंड होऊ दया. दुसऱ्या भांडयामध्ये 2 लि. दुध घ्या व ते मंद आचेवर एक उकळी येऊ दया व त्याला थंड होऊ दया.


200 लि. पाणी + सुंठ अर्क + थंड दुध


हे मिश्रण चांगले ढवळा व दोन तास ठेवा. त्यानंतर गळून घ्या व फवारणी करा. हे द्रावन 48 तासांपर्यंत वापरावे. 1 एकरासाठी हे पिकांसाठी टॉनीक आहे.


 


1. 200 लि. पाणी + 2 लि. नारळाचे पाणी


सप्तधान्यांकुरअर्क :


ऐका छोटया वाटी मध्ये 100 ग्रॅम तीळ घ्या व ते पाण्यात भिजवून ठेवा.दुसऱ्या दिवशी ऐक मोठे भांडे घ्या त्यामध्ये


100 ग्रॅम मुग + 100 ग्रॅम ऊडीद + 100 ग्रॅम चवळी + 100 ग्रॅम मटकी +


100 ग्रॅम देशी हरबरा + 100 ग्रॅम गहू


ह्या सगळयांना मिसळा व धान्य भिजतील एवढेच पाणी टाका. घरात ठेवा.


तिसरया दिवशी सकाळी पाण्यातून धान्य काढून घ्या व एका ओल्या फडक्यात बांधा व मोड येण्यासाठी लटकवून ठेवा. भिजवलेले पाणी फेकून देऊ नका.


1 सेमी. मोड आल्यावर सगळयांची चटणी वाटा.


200 लि. पाणी + 10 लि. देशी गार्इचे गोमूत्र + कडधान्य भिजवलेले पाणी व चटणी मिसळा व काडीने चांगले ढवळा व गोणपाट झाका. हे मिश्रन 4 तास ठेवा. 4 तासानंतर पुन्हा ढवळा व गळून घ्या व फवारणी करा.


टॉनीक फवारणीची वेळ:


दाणे दुधावर असताना़, फळ किंवा शेंगा लहान असताना, पालेभाज्या काढण्याच्या 5 दिवस आधी,फुलं कळी अवस्थेत असताना फवारणी करणे.


निम मलम : खोडावर लावण्यासाठी


50 लि. पाणी + 20 लि. देशी गार्इचे गोमुत्र + 20 किलो. शेन


+ 10 किलो लिंबाच्या फांदया पानासकट चटणी मिश्रन चांगले ढवळा व गोणपाट झाका व 48 तास ठेवा. दिवसातून दोन वेळा ढवळा. 48 तासानंतर वापर करा व वर्षातून 3 ते 6 वेळा वापरा.


नोट : समजा निममलम उपलब्ध नसेल तर


देशी गार्इचे ताजे शेन + गोमुत्र मिश्रण लावणे.


COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group