स्थापनेनंतर पन्नास वर्षांनी मुस्लिम समाजाला मिळणार संधी
अद्याप धर्माबाद शहरातील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाच्या संचालक मंडळात पहिल्यांदाच मुस्लिम समाजातील व्यक्तीला संधी मिळणार आहे. एक जेष्ठ संचालकाच्या निधनानंतर शहरातील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाच्या एक संचालकाचे पद रिक्त आहे, गेल्या पन्नास वर्षांपासून मुस्लिम समाजाला महाविद्यालयात प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालीच नाही.या लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाच्या संचालक मंडळामध्ये मुस्लिम समाजातील व्यक्तीला घेण्याची जोरदार मागणी होत आहे.यासाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण, माजी आमदार वसंतराव चव्हाण आणि डीपी सावंत यांचे कट्टर समर्थक आणि कॉंग्रेसचे समर्थक, राष्ट्रीय मानव संसाधन चे मराठवाडा अध्यक्ष व महाराष्ट्र भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे प्रदेश अध्यक्ष आणि कॉंग्रेस नेत्यांचे निकटचे, सुप्रसिद्ध समाज सेवक डॉ.तौफिक खान पठाण यांना ही संधी मिळणार आहे. अशीच चर्चा धर्माबाद व नांदेड शहरात सर्व स्तरातून होत आहे. डॉ. पठाण यांचे सर्व समाजांशी चांगले संबंध आहेत, आता मुस्लिम समाजाला ही संधी मिळते की नांदेडमध्ये नेहमीप्रमाणे जशी एमएलसीची स्थिती होते आहे का हे पाहणे आहे. धर्माबादच्या या महाविद्यालयाच्या संचालक मंडळामध्ये डॉ पठाण यांच्या नावाची चर्चा असल्यामुळे सर्व मुस्लिम समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे आणि डॉ. पठाण यांची निवड निश्चित मानली जात आहे. महाविद्यालयाची स्थापना होउन पन्नास वर्षांहून अधिक वेळ झाला आहे. परंतु मुस्लिम समाजाला अद्याप ही संधी मिळालेली नाही आणि डॉ.पठाण च्या रुपात ही पहिली संधी असणार आहे. आमच्या वार्ताहरांशी बोलताना, माजी नगरसेवक श्री समीर अहमद म्हणाले की धर्माबाद मधील मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व द्यावे आणि या सामाजिक कार्यासाठी, श्री.तौफिक खान योग्य आहेत, ते उच्च शिक्षित व्यक्ती असून त्यांच्यातील गुण व अनुभवाचा फायदा महाविद्यालया सोबतच सर्व सामान्यांच्या विद्यार्थ्यांना होईल आणि ते सर्वांच्या सुखात व दुःखात येतच असतात. माजी नगराध्यक्ष अॅडव्होकेट श्री सुरेंद्र बेळकोणीकर, उद्योजक श्री सुबोध काकाणी, टिपू सुलतान ब्रिगेडचे नवीद अहमद, संपादक श्री.डॉ सुधीर येलमे, अॅडव्होकेट श्री. राहुल सोनटेके आणि बसपाचे गजभारे वैजनाथ यांनी डॉ. पठाण यांचे समर्थन केले आहे.
-- ग्लोबल मराठवाडा न्युजसाठी - अहमद लड्डा, धर्माबाद.
COMMENTS