आष्टीत लोकनेते मुंडेसाहेब यांच्या पुण्यस्मरणानिमित्त भीमराव धोंडे यांच्या घरी अभिवादन
आष्टी (प्रतिनिधी)
माजी केंद्रीय ग्रामविकास मंञी लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे पुण्यतिथीनिमित्त भाजप नेते माजी आ.भीमराव धोंडे यांच्या निवासस्थानी सोशल डिस्टन्स नियम पाळत प्रतिमेचे पूजन केले.लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना
" अंबा " फळ आवडत असल्याने पुण्यतिथीनिमित्त
पदाधिका-यांना
" हापुसअंबा " खाऊ घालण्यात आले.यावेळी माजी आ.भीमराव धोंडे हे मुंडेसाहेब यांच्या आठवणी सांगताना भावुक झाले होते.भीमराव धोंडे म्हणाले की,गोपीनाथराव मुंडे आणि मी वेगळ्या पक्षात असल्यापासुन आमची घनिष्ठ मैञी होती.राजकारणापलिकडे बीड जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही एकञ यायचो.त्यांची विकासदृष्टी ,संघर्षमयी कारर्किर्द वाखणण्याजोगी होती.गोपीनाथरावांचे जनमाणसातील अढळ स्थान आहे.भारतीय राजकारणात मोठी झेप असताना त्यांनी एक्झीट घेतली हे खरे आहे परंतु आजही ते त्यांच्या विशाल कार्यामुळे अजरामर आहेत.त्यांच्यानंतर माजी मंञी पंकजाताई मुंडे व आपल्या खासदार डाॕ.प्रितमताई मुंडे या राजकारणात प्रभावीपणे काम करत आहेत.आज राज्यसरकारने कोरोना संकटासाठी गरीबांसाठी स्वतंञ मोठे आर्थिक पॕकेज जाहिर करुन आदरांजली अर्पण करण्याची गरज आहे असे भीमराव धोंडे यांनी सांगितले.यावेळी जेष्ठ नेते बबनराव झांबरे,ॲड.वाल्मीकतात्या निकाळजे,ॲड.साहेबराव म्हस्के , जेष्ठ नेते लालाभाऊ कुमकर ,आदिनाथ सानप,अजय धोंडे ,तालुकाध्यक्ष ॲड.हनुमंत थोरवे,अभय धोंडे, किशोर खोले,संजय सिरसाट ,अशोक साळवे,एन.टी.गर्जे ,संतोषभैय्या चव्हाण,राजेंद्र धोंडे ,अरुणभैय्या निकाळजे ,बाजीराव वाल्हेकर,सतीशमामा झगडे ,सावता ससाणे,बाबु कदम,लक्ष्मण उकले,शेख मैनोद्दीन,विठ्ठल लांडगे,लक्ष्मण शेळके,विठ्ठल बन्सोडे,दिलीप काळे, वाय.आर.गर्जे,बाळासाहेब शिंदे,संदीप नागरगोजे,दिलीप काळे,बापुराव गर्जे ,बजरंग कर्डीले आदि भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
*********************
COMMENTS