*अहिल्याबाई होळकर यांची जंयती सामाजिक स्वरुपात साजरी केल्या बद्दल ज्ञानेश्वर सरवदे यांचा सत्कर*
माजलगाव ( प्रतिनिधी ) राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या २९५ व्या जयंतीनिमित्त, ढोरगाव मध्ये कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ८० गोरगरीब कुटुंबाना एक महिना पुरेल एवढ्या किराणा सामानाचे वाटप करुन,अहिल्याबाई होळकर यांची जयंती एक सामाजिक स्वरूपात साजरी केल्याबद्दल गंगामसला सर्कलच्या वतीने भाजपाचे तालुका उपध्याक्ष ज्ञानेश्वर सरवदे यांचा धनगर समाजाच्या वतिने सत्कार करण्यात आला.
राजमाता पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांनी त्यांच्या राज्यातील सर्व संपत्ती दान करत त्यांनी गंगेच्या काटावरील घाट तसेच शंभु महादेवाच्या मंदिराचे जिर्णोध्दार करत दानत्वाची परिचिती करुन देऊन समाजा समोर एक आदर्श ठेवला आहे,राजमाता आहिल्याबाई होळकर यांच्या या आदर्श कार्याच्या पाऊला पाऊल ठेवत,राजमाता पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांच्या २९५ व्या जंयतीचे औचित्य साधून ढोरगाव येथे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लाँकडाऊन मध्ये गोर-गोरीब मजुरांची उपासमार होऊ नये या हेतूने ८० गोर-गोरीब कुटुंबाना एक महिना पुरेल एवढे किराणा समान वाटप करुन राजमाता आहिल्याबाई होळकर यांची जंयती एक सामाजिक स्वरुपात साजरी केल्याबद्दल गंगामसला सर्कल मधील धनगर समाजाच्या वतीने शिंपेटाकळीचे से.स.सो.चे चेअरमन शरद कुंडकर,संपत्ती नाना कुंडकर,अर्जुन गोरे,हानुमान देवकते,तात्या पंचाळ व दत्ता विसवळे यांनी भाजपाचे तालुका उपध्याक्ष ज्ञानेश्वर सरवदे यांचा सत्कार करण्यात आला.
COMMENTS