मु. अ. मोहन गिरी यांचा सेवानिवृत्ती बद्दल सत्कार .
June 4, 2020 • मराठवाडा .. • UDGIR
उदगीर -मातृभूमी मित्रमंडळाच्या वतीने मुख्याध्यापक मोहन नारायण गिरी यांचा उदगीर येथे सत्कार करण्यात आला. मुअ गिरी हे देवणी तालुक्यातील धनेगांव येथील रहिवासी असून त्यांनी नोकरीचा कार्यकाल हा अतिशय यशस्वीरीत्या पूर्ण केला त्या बद्दल मातृभूमी मिञ मंडळाच्या वतीने निवृत्ती बद्दल सत्कार केला. मोहन गिरी यांची प्रथम नेमणूक ११ जुलै१९८३ साली लातूर येथील राजस्थान हायस्कूल येथे झाली. तेथे त्यांनी २ वर्ष अतिशय उत्कृष्ट कार्य केले .१९८५ते १९८७पर्यंत जि.प. प्रा.शा. शेकापूरवाडी . त्यानंतर १९८७ते १९९९पर्यंत हेळंब ता . देवणी येथे कार्य केले तेथे त्यांनी शिष्यवृत्ती व नवोदय अशा स्पर्धा परिक्षेत विद्यार्थ्यांना उल्लेखनीय असे यश प्राप्त करून दिले . ग्रामीण भागात स्पर्धा परिक्षेची ओळख करुन दिली. १९९९ते २००५ पर्यंत जि.प. प्रा शा .लोणी येथे कार्य केले. २००५ते २०१३ दरम्यान शेल्लाळ येथे मुख्याध्यापक पदावरुन काम करत शाळा जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आणली.२०१४ ते २० दरम्यान देवणी तालुक्यातील जि प शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम करत शाळा डिजिटल केली त्यादरम्यान शाळेला पाच पारितोषीके मिळवले व आय एस ओ नामांकन प्राप्त झाले.व गीरी याना आदर्श प्रशासक म्हणून जिल्हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.उत्कृष्ठकार्य करत मुख्याध्यापक पदावरुन सेवानिवृत्त झालेल्या मोहन गिरी यांचा सत्कार मातृभूमी मिञमंडळाचे सतिश उस्तुरे ,सुधीर पाटील ,शिवाजी गिरी,संभाजी शिंदे ,रामदास मलवाडे,संजय बोरोळे ,दयानंद मठपती यांनी केला.
COMMENTS