- शेतकऱ्याची लुट खपवुन घेणार नाही - ऍड गोले शेकाप
----------------------------------
माजलगाव प्रतिनिधी माजलगाव तालुक्यात योग्य प्रमाणात पाऊस झाल्याने खते ,बी- बीयाणे,औषधे घेण्यासाठी शेतकरी कृषी केंद्रावर गर्दी करत आहेत, यात संधी साधून काही दुकानदार नको असलेले खते,औषधी देत व चढ्या भावाने विक्री करत शेतकऱ्यांची अडवणूक करत आहेत.मात्र कृषी विभाग साखर झोपेत आहे काॽ असा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्याला पडत आहे.खताची विक्री चढ्या भावाने होत असल्याचे निदर्शनास आल्याने शेतकऱ्यांनी तक्रार करत शेतकरी कामगार पक्षाच्या निदर्शनास आणून दिले. शेकापने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक होऊन कृषीकेंद्राचे स्टींगऑपरेशन करत संचालकांना आहे त्या योग्य भावात विक्री करण्यास भाग पाडले.
शनिवारी शहरातील मोंढ्यात शेतकऱ्यांना चढ्या भावाने खाताची विक्री व युरिया खतासोबत दुसरा खत घेणे बंधनकारक ठेवल्यामुळे भाई अॅड. नारायण गोले पाटील यांच्याकडे शेतकऱ्यांनी तक्रार केली, यावेळी त्या्ंनी स्वतः तेथे जाऊन रामकृष्ण कृषी सेवा केंद्र व बळीराजा कृषी सेवा केंद्र येथे चौकशी केली असता युरिया खताचा पाचशे तीस रूपये किंवीटल प्रमाणे भाव असताना दुकानदार सहाशे पन्नास रूपये किंवीटल म्हणजे चढ्या भावाने विक्री करत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार योग्य असल्याचे निदर्शनास आले, म्हणून या प्रकाराबाबत संबंधित कृषीकेंद्राची रीतसर तालुका कृषीअधिकारी, जिल्हाकृषीधीकारी या्ंच्याकडे तक्रार करून त्या्ंना जायमोक्यावर बोलवून त्यांना रीतसर आलेल्या भावात विक्री करण्यास भाग पाडले. परंतू अशा सर्व कृषीके्ंद्रा्ंना कृषी विभागाने समज देऊन हे प्रकार थांबवणे आवश्यक आहे, कारण तक्रारी व वादावादीत शेतकऱ्यांना वेळ वाया जातो, पेरणीची व शेतीतील कामांसाठी हा वेळ महत्त्वाचा असल्याने शेतकरी निमुटपणे सर्व सहन करतात, त्यासाठी कृषी विभागाकडे योग्य ती कार्यवाही करून असे प्रकार थांबवावेत अशी अपेक्षा भाई अॅड.नारायण गोलेपाटील या्ंनी व्यक्त करत शेतकऱ्याची लुट शेतकरी कामगार पक्ष कदापिही खपवुन घेणार नाही,तर योग्य भाषेत ऊत्तर देणार असल्याचे सा्ंगितले
यावेळी तालुका कृषी अधिकारी एस.एस. संगेकर, कृषी अधिकारी प.स.सिद्धेश्र्वर हजारे, शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई अॅड. नारायण गोले पाटील, शेतकरी भास्करराव काळे,लहु सोळंके व इतर आनेक गावातील शेतकरी उपस्थित होते.
COMMENTS