महाराष्ट्रातील भाविक भक्ताचे श्रद्धा स्थान असलेल्या श्री क्षेत्र गहीनीनाथ गड येथून आषाढी यात्रेनिमित्त संत वामनभाऊ महाराजांच्या पादुका हेलिक...
महाराष्ट्रातील भाविक भक्ताचे श्रद्धा स्थान असलेल्या श्री क्षेत्र गहीनीनाथ गड येथून आषाढी यात्रेनिमित्त संत वामनभाऊ महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने पंढरपूर ला घेऊन जाण्यासाठी सरकार ने परवानगी नाकारली आहे.ही परवानगी मिळण्यासाठी मुंबई उच्चन्यायालयाचे खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका ह.भ.प.विठ्ठल महाराज गहिनीनाथ गडाचे मठाधिपती यांनी दाखल केली असून मंगळवार दि.३० जून रोजी त्यावर न्याय निर्णय होणार आहे.
परिसरातील १० जिल्ह्याचे लाखो भाविकांचे गहिनीनाथ गड हे श्रद्धा स्थान असल्याने हेलिकॉप्टरची परवानगी मिळेल आशा माजी आ. भीमराव धोंडे यांनी व्यक्त के
ली.
COMMENTS