शासकीय कापूस पावसानं भिजला ; पणनचे आदेश ; खरेदी बंद ; संतप्त शेतकऱ्यांनी महामार्ग अडवला.
-------------------------------------
शासकीय कापूस खरेदी केंद्र तीन दिवसापासून बंद असल्याने कापूस भरून आणलेल्या वाहनांचा खर्च वाढत चालला असून कापूस खराब आहे म्हणून घेत नाहीत.खरेदी केंद्रावर आम्ही तीन दिवसापासून इथं असून पिण्याच्या पाण्याची देखील सोय नाही.
श्रीमंत जगताप
लहामेवाडी शेतकरी -
---माजलगाव : प्रतिनिधी
31 मे रोजी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शासकीय खरेदी केलेला कापूस भिजल्यामुळे दि.1 जून पासून पुढील आदेश देईपर्यंत शासकीय कापूस खरेदीबाबतचे एसएमएस शेतकऱ्यांना पाठवण्यात येवू नये असे लेखी आदेश पणन महासंघाने काढले आहेत.परंतु खरेदी करण्या बाबतचे एसएमएसच्या माध्यमांतून बोलावल्यामुळे टीएमसी शेड परिसरात शेतकऱ्यांनी कापूस खरेदीस आणला.त्यातच खरेदी बंद करण्यात आल्यामुळे महामार्ग क्र.61 कल्याण-विशाखापट्टणम अडवल्याने सर्वत्र गोंधळ उडाल्याने महामार्गावरील वाहतूक ही ठप्प झाली होती.परंतु पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांनी सदरची वाहतूक सुरळीत केली.बाजार समितीचे सचिव सवने यांना विचारणा केली असता पाऊस थांबत नाही तोपर्यंत बंद राहणार असे भ्रमणध्वनीवरुन बोलतांना सांगितले.
शासकीय कापूस खरेदी पावसामुळे 3 दिवस झाले बंद असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी एसएमएस द्वारे संपर्क केल्यामुळे शेतकरी तीन दिवसापासून या टीएमसी शेड परिसरात कापूस घेवून आले.परंतु ही खरेदी बंद असल्यानं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दोनशे ते अडीचशे कापूस भरलेल्या वाहनंं रस्त्याच्या दुतर्फा रांगा लावून उभी होती. वाहनांसह अडकुन पडल्याने संतप्त शेतकऱ्यांनी खरेदी सुरुच करण्यात यावी यासाठी रास्ता रोको केल्यामुळे सदर मार्गावर वाहतूक खोळंबली असल्याने वाहनधारकां-ची त्रैधा तिरपीट उडाली.
खरेदी केंद्रावर आलेले शेतकरी बोलतांना म्हणाले,
तीन दिवसापासून खरेदी बंद आहे.पाऊस पडल्याने आमचा कापूस भिजला आता आम्ही काय करावे.व खरेदी केंद्रावर कापूस आणण्यात यावा असा मेसेज पाठवून बोलावण्यात आल्यामुळे आम्ही वाहन घेवून आलोत तर आता कापूस खरेदी बंद असल्याचे येथे आल्यावर कळल्याने आम्हाला असे हेलपाटे आता परवडणारे नाहीत.एकतर कापूस खराब म्हणून घेत नाहीत.आणि दुसरीकडे व्यापारी कवडीमोल भावात घेत असून तोच व्यापारी शासकीय खरेदी केंद्रावरच विक्रीसाठी आणतो मग असा दुजाभाव का ? असा प्रश्न शेतकरी विचारु लागले आहेत.
--------------------------------
सोशल डिस्टंंन्सचा शेतकऱ्यांसह नेत्यांना विसर !
कापूस खरेदी केंद्र बंद असल्यानं एसएमएस करुन बोलावण्यात आलेल्या शेतकऱ्यांनी वाहनांत कापूस घेवून सदर खरेदी केंद्रावर आणला परंतु खरेदी बंद असल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी महामार्गावर गर्दी केल्याने टीएमसी शेड परीसरात सोशल डिस्टंंन्सचा विसर शेतकऱ्यांसह उपस्थीत नेत्यांना ही पडल्याचे दिसून आले.
-------------------------------------
COMMENTS