- दुस-या टप्यातील शंभर क्विंटल धान्य वाटपाचा टप्पा पूर्ण
- मानवी हक्क अभियानचा गोर - गरिबांना दिलासा
--------
माजलगाव, दि. 3 (प्रतिनिधी) : कोविड - 19 कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर हातावर पोट असणा-या व समाजातील गोर - गरिब, वंचित लोकांना पहिल्या टप्यात शंभर क्विंटल धान्याचे वाटप करण्यात आले होते तर आज दि. 3 बुधवारी शंभर क्विंटल धान्य वाटप करत वाटपाचा दुसरा टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. मानवी हक्क अभियानाचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर अॅड. एकनाथराव आवाड यांचा वसा व वारसा खंबीरपणे पुढे चालवण्याचे काम डाॅ. मिलींद आवाड हे करत आहेत.
कोरोनाने देशातच नव्हे तर जगात हाहाकार माजविलेला आहे. त्यामुळे शासनाने लाॅकडाउन घोषित केले. परिणामी हातावर पोट भरणा-या अनेकांचे संसार उघड्यावर आले. मुंबई, पुण्या सारख्या महानगरात मजुर म्हणुन काम करणा-या अनेकांच्या हाताचे काम गेले त्यामुळे त्यांच्या दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत झाली. त्यांनी गावाकडे आल्यासही त्यांना याच परिस्थिती जगावे लागत आहे. मुंबई, पूण्याहून वापस आलेल्या मजुरांने खेडेपाडे भरलेले असुन त्यांच्यासह गावातील गोर - गरिबांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे डाॅ. मिलींद आवाड यांनी धान्य वाटपाचा निर्णय घेत मागील महिणाभरापूर्वी शंभर क्विंटल धान्याचे वाटप केले होते आणि आता दुस-या टप्यातही बुधवारी शंभर क्विंटल धान्याचे वाटप केले. यावेळी मानवी हक्क अभियानाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान गोर - गरिबांना धान्य मिळाल्याचा आनंद चेह-यावरून ओसंडून वाहत होता.
COMMENTS