- जिल्हास्तरीय ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन
- नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचा उपक्रम
सेलू : येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्यावतीने दलित मित्र श्रीरामजी भांगडीया स्मृतिदिनाचे औचित्यसाधुन नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या ८१ व्या वर्धापनदिना निमित्ताने जिल्हास्तरीय ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पहिला गट नववी ते बारावी असून ' कोव्हीड १९ नंतरची शाळा ' , दुसरा गट वरिष्ठ महाविद्यालयीन ' कोव्हीड १९ नंतरची महाविद्यालये ' आणि तिसरा गट नूतन विद्यालय शिक्षण संस्थेतील शिक्षक, प्राध्यापकांसाठी ' कोव्हीड १९ नंतरची माझी जबाबदारी ' या विषयावर शुक्रवार दि. १० जुलै पर्यंत निबंध मागविण्यात आली आहेत.
नववी ते बारावी गट ९८६००५३४९५ , ९४०३८२४३०१ , ९९६००८०९४२ वरिष्ठ महाविद्यालयीन गट ७५८८४३४९३९ , ९४०४०७७७७५ तर शिक्षक , प्राध्यापक गटातील स्पर्धकांनी ७५८८१६१५३०, ९४०३८२४३०१ या आपल्या गटातील कोणत्याही एकाच वाटसअप नंबरवर आपले निबंध पीडीफ स्वरूपात पाठवावीत. तिन्ही गटासाठी प्रथम १००० , द्वितीय ७०० व तृतिय ५०० रूपये बक्षीस असून सर्व सहभागी स्पर्धकांना वाटसअपवर प्रमाणपञ मिळतील. नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डाॅ. एस.एम.लोया, सचिव डी.के.देशपांडे, सहसचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर , जयप्रकाश बिहाणी यांच्या मार्गदर्शनाखाली संयोजक प्राचार्य डॉ शरद कुलकर्णी, मुख्याध्यापक एन.पी.पाटील, अनिल कुलकर्णी, मुख्याध्यापिका संगीता खराबे, रेवती देशपांडे , उपमुख्याध्यापक घोगरे , सहसंयोजक पर्यवेक्षक अशोक वानरे, रामकीशन मखमले, आर.एन.सोन्नेकर, स्पर्धा समन्वयक प्रा.नागेश कान्हेकर, सुरेश हिवाळे निबंध स्पर्धा यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.
COMMENTS