* देश * सेलू (प्रतिनिधी) परभणी जिल्ह्यात सध्यास्थितीत आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता करोना विषाणूंचा संसर्ग जनसामान्यांना होऊ नये यासाठी उप...
- *
देश*
सेलू (प्रतिनिधी)
परभणी जिल्ह्यात सध्यास्थितीत आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता करोना विषाणूंचा संसर्ग जनसामान्यांना होऊ नये यासाठी उपाययोजना म्हणून सार्वजनिक स्थळी व ठिकाणी चेहऱ्यावर मास्क न वापरणे आणि नाक व कान तोंड सुरक्षितपणे पुर्ण नं झाकणे यासाठी प्रथम दर्शनी आढळल्यास त्यांच्याकडून दंडात्मक कारवाई म्हणून दोनशे रुपये आकारण्यात येतील. तोच व्यक्ती दुसऱ्यांदा आढळल्यास दंडात्मक कारवाई म्हणून पाचशे रुपये दंड आकारण्यात येणार आहे. असे आदेश परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत. ही कारवाई करण्यासाठी पोलीस विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, संबंधित शासकीय विभाग यांना अधिकार देण्यात आले आहेत. या सर्व प्रकारामुळे आता परभणी जिल्ह्यात मस्त न लावता फिरल्यास त्यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
COMMENTS