नांदेड *जिल्हा तील ठळक घटना
▪️ शहरातील बालाजी मंदिर परिसरातील विजय क्लाॅथ सेंटरचे तीनही शटर व वजिराबाद परिसरातील मल्टीपर्पज हायस्कूल जवळील कपड्याचे दुकान जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना सकाळी उघडकीस आली.
▪️ भोकर नगरपरिषदेचे लिपीक साहेबराव मोरे यांना नगरसेवक केशव मुद्देवाड यांनी जातीवाचक शिवी गाळ केल्यामुळे संबंधितावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी उमरी न.प. कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले.
▪️ सलुन व्यवसायाला सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
▪️ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून नांदेडसह राज्यातील शिक्षकांची रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी, अशी मागणी पुरोगामी शिक्षक संघटनेच्या वतीने शासनाकडे करण्यात आली.
▪️ माहूर तालुक्यातील वडसा येथे कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर गाव सील करण्यात आले होते. कंटेन्मेंटचा कालावधी संपल्यानंतर ग्रामस्थांनी कोरोना योध्दांचा सत्कार करण्यात आला.
COMMENTS