*
June 10, 2020 • ग्लोबल मराठवाडा
*देवणी*....राजेंद्र हाल्लाळे
: *देवणी तालुक्यात मृगाच्या पावसाने वेळेत सुरुवात केली आहे दहा जून रोजी झालेला पाऊस शेतकरी यांना सुखद धक्का देणारा आहे मृगापूर्वी शेतीत पेरणी पूर्ण मशागती शेतकरी पूर्ण करून मृगकडे डोळे लावून बसलेला शेतकरी मृगाच्या पहिल्या पावसात आनंदून ओलाचिंब झाला काळ्या आईची ओटी आपण वेळेत भरू असा आत्मविश्वास वाढला आहे " *शेतकरी यांच्या ओठांवर काळ्या मातीत मातीत तिफन चालते हे गीत गुणगुणत असताना कानी पडणार आहे *खत बी बियाणे यांच्या शोधत अनेक सावकाराकडे उसनं पासन करून आपल्या शेतीतील भरभरून येणाऱ्या पिकांचे गोड स्वप्न रंगवीत आपल्या *काळ्या आईची ओटी भरताना दरदरची ठोकरे खात अनेक सावकार यांच्या दारोदार फिरतांना दिसत आहे आपल्या संसाराचा गाडा चालविण्यासाठी मुलाचे शिक्षण मुलीचं लग्न अशे मृगजळाप्रमाणे स्वप्न पाहत असताना दिसतो आहे यंदाचा पाऊस वेळेत पडू दे भरघोस पीक येऊ दे शेतकरी कर्जमुक्त होऊन सुजलाम सुफलाम होऊ दे अशी परमेश्वराकडे विनवणी करताना दिसत आहेत
COMMENTS