मुंबई 10 जून 2020
सामनाचे मीरा भाईंदर येथील पत्रकार यतीन गोलतकर यांचं कोरोनाचं वार्तांकन करताना बाधा होऊन निधन झालं आहे..
कोरोनाचं रिपोर्टिंग करताना एखाद्या पत्रकाराचं निधन झालं तर त्यांच्या कुटुंबीयांना 50 लाखांची मदत करण्याची घोषणा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.. सरकारनं आता आपल्या शब्दाला जागावं आणि यतीन यांच्या कुटुंबियांना तातडीने मदत करावी.
कोरोनानं निधन झालेले यतीन गोलतकर हे राज्यातील पहिले पत्रकार असले तरी यापुर्वी 60 - 65 पत्रकारांना बाधा झाली होती. सुदैवानं त्या सर्वांची प्रकृती आता चांगली आहे.. मात्र ज्यांना बाधा झाली होती त्या पत्रकारांच्या बहुतेक व्यवस्थापनानी पत्रकारांना वारयावर सोडले होते.. एकनाथराव शिंदे यांनी यातील अनेक पत्रकारांना मदत केली होती.. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी स्वतःची काळजी घ्यावी.. बातमीदारी करताना नको ते साहस करू नये.. अनेक बडया माध्यमात पत्रकारांच्या हाती नारळ देण्याची मोहिम सुरू आहे.. आपण बाधित आहोत असा संशय जरी व्यवस्थापनाला आला तरी आपल्याला नोकरीवरून कमी केले जाऊ शकते. अशा स्थितीत बातमी किंवा अन्य कोणत्याही गोष्टी पेक्षा स्वतःची काळजी महत्वाची ठरते .. कारण लढ म्हणणारे अनेक आहेत मात्र गरज पडते तेव्हा पाठिशी कोणीही असत नाही हे अनेक प़संगात दिसून आलं आहे.. मुंबईतील एका पत्रकाराकडे उपचारासाठी पैसे नसल्यानं त्या पत्रकाराला आपल्या पत्नीचा मृत्यू डोळयानं पहात बसावं लागलं.. ही घटना ताजीच आहे.. या सारया गोष्टींची सर्व पत्रकार मित्रांनी जाणीव ठेवावी आणि काळजी घ्यावी.
यतीन गोलतकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली
सौजन्य sm deshmukh fb wallvarun
COMMENTS