साहेबांचा आर्शीवादाने , यमाच्या दारातून परत आलो ,, सहा महिण्या नंतर बाहेर पडताना , गोपीनाथ गडावर नतमस्तक झालो ,
आर, टी , देशमुख यांची भावूक प्रतिक्रिया बरेच काही सांगते
माजलगाव ( प्रतिनिधी )
माझ्या आजारातून मी बाहेर पडणार ?यावर माझाच विश्वास नव्हता , चार महिणे मी जगच पाहू शकलो नाही , एका वडिलाला वाचवण्या साठी मुल काय कष्ट घेवू शकतात ?हे मी डोळयानी पाहिल , या आजारात माझा पुर्नरजन्म झाला , माझी प्रकृती ठणठणीत झाली , माझ दैवत स्व , मुंडे साहेबांचा पुण्यतिथीला मी घराबाहेर पडून समाधीस्थळावर नतमस्तक झालो , साहेबांचा आर्शावाद आणि प्रेरणा मागे होती म्हणुन मी पुन्हा मानवी विश्वात परत आलो ,, सतत साहेबांची आठवण येते या शब्दात माजी आमदार आरटी देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
देशमुख यांच्या पोटाच्या आजारावर फार मोठी शस्त्रक्रिया झाल्या नंतर सहा महिन्या पासून पुण्याच्या दवाखान्यात होते , पोटाचे लिव्हर बदलने म्हणजे माणसाचा पुनरजन्म होय. वडिलाच्या सर्व निर्णय प्रक्रियेत मुलांनी फार मोठे धाडस करून आपल्या जन्मदात्याला मरणाच्या दाढेतून परत आणले , या प्रसंगात मुलांनी केलेल्या कठोर परिश्नम जिजांनी पाहिले तब्बल सहा महिणे दवाखान्या काढावे लागले पुण्य कर्म फळा येते अस पण म्हणतात कारण देशमुख यांनी आपल्या आयुष्यात खुपच सामान्य लोकांची गरजूची सेवा केलेली आहे. त्यांची जनसेवा माजलगाव मतदार संघात लोकांनी पाहिली गोपीनाथ मुंडेचा विश्वासू हि ओळख त्यांच्या चेहऱ्याला होती जिवापाड प्रेम साहेबावर त्योनी केलेले आहे. अजारातून बाहेर पडल्या नंतर एक महिन्या पासून परळीत आले मात्र डॉक्टरांचा सल्ला आणि कोरोना मामुळे घराबाहेर पडले नाही मात्र काल मुंडे साहेबांची पुण्यतिथी ? मग ते घरात बसणार तर मग आरटी कुठले खा. डॉ. प्रितमताईच्या सोबत गडावर येवून वडिलोपार्जीत धर्माचे पालन केले गडावर नतमस्तक झाले. साहेब केवळ तुमच्या आर्शावादाने मी परत आलो आशा प्रकारचा हदयस्त भाव आदरांजली अर्पन करतांना प्रगट केला. समाधीस्तळावर जावून त्यांनी जणू काही नव्या पर्वाला सुरुवात केली असच म्हणावे लागेल गडावर आम्हाला प्रेरणा मिळते ? ताकद मिळते साहेब असतांना ज्या प्रेमाणे त्यांची एकदा भेट झाली कि जगण्याच आमृत मिळायाच त्याची प्रचिती गडावरुन येते ? साहेबांचा आर्शीवाद मला पुनरजन्मा साठी निरिचत महत्वाचा ठरला आशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
COMMENTS