पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी शासन दरबारी संघर्ष करणार - प्रदेशाध्यक्ष वसंतरावजी मुंडे
लातूर (प्रतिनिधी):
कोरोना या महामारिने जगात हहाकार माजवला असता प्रत्येक ठिकाणी बातमीमागची बातमी जगासमोर यावी म्हणून पञकारबांधव आपला जीव मुठीत धरून आपल्या जीवाची,कुटुंबाची पर्वा न करता आपल्या वृत्तपञ किंवा वृत्तवाहिणीवर यावी म्हणून काम करत असतो परंतु शासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने आपण पञकारांच्या न्याय हक्कासाठी शासन दरबारी संघर्ष करणार असल्याची भूमिका महाराष्ट्र राज्य पञकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतरावजी मुंडे यांनी व्यक्त केली. बुधवार दि.3 जून रोजी लातूर जिल्ह्यातील पञकार बांधवाशी झूम ॲपद्वारे प्रदेशाध्यक्ष मुंडे बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पञकारांकडे पाहिले जाते परंतु वारंवार हल्ले होणे,वृत्तसंकलणास जाताना अॕक्सीजेंट होवून जखमी होणे यावर कोणीही बोलत नाही. ना संरक्षण कायदा, ना विम्याचे कवच, ना राहिला व्यवस्थित घर नसणे, मुलाबाळांच्या शिक्षणाची अडचण आदीसह अनेक समस्यांना तोंड देत पञकार बांधव जगत आहे.या पुढील काळात आपण महाराष्ट्रातील पञकारांच्या अडीअडचणी सोडवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असेही शेवटी प्रदेशाध्यक्ष वसंतरावजी मुंडे म्हणाले.
कोरोना महामारीमुळे राज्यभर लॉक डाऊन परिस्थिती निर्माण झाल्याने प्रत्येक जिल्ह्यातील पत्रकारांशी झूम ॲपद्वारे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे हे ऑनलाइन संवाद साधत आहेत. बुधवार दिनांक 3 जून रोजी त्यांनी लातूर जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष अशोक देडे, संघटक महादेव डोंबे, कायाॕध्यक्ष रघुनाथ बनसोडे, सचिव अशोक हणवते,कोषाध्यक्ष अरूण कांबळे यांच्या प्रयत्नामुळे झुम ॲपद्वारे त्यांना व्हीडिओ संवाद तालुकाध्यक्ष आणि ग्रामीण भागातील पत्रकारांशी संवाद साधला आला.यावेळी ग्रामीण भागातील पत्रकारांनी लॉक डाऊनमुळे ग्रामीण भागातील पत्रकारांवर मोठी आर्थिक बिकट परिस्थिती ओढवली आहे.तेव्हा माध्यमातील प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांचे महत्त्व लक्षात घेऊन शासनाने देखील आरोग्य आणि पोलीस कर्मचाऱ्याना ज्या पद्धतीने आर्थिक पॅकेज आणि विम्याचे संरक्षण दिले आहे त्याच धर्तीवर पत्रकारांना आर्थिक पॅकेजसह विम्याचे संरक्षण द्यावे, अशी भूमिका प्रदेशाध्यक्ष मुंडे यांच्याकडे मांडली.
संवाद साधताना प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे म्हणाले की,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी पत्रव्यवहार करून पत्रकार आणि मीडियातील विविध घटकांतर्गत येणार्आयांना अर्थिक पॅकेजसह विम्याचे संरक्षण देण्यात यावे अशी मागणी केली आहे तर महामारीच्या लढाईत सर्व खबरदारी पाळून आपली नैतिक जबाबदारी पार पाडावी, असेही भावनिक आवाहन मुंडे यांनी पञकारांशी केले.
झूम ॲपद्वारे व्हिडिओ संवाद यशस्वी होण्यासाठी राज्य सरचिटणीस विश्वास अरोटे, प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव, मराठवाडा संपकॕ प्रमुख वैभव स्वामी यांनी मदत केल्यामुळे जिल्हाध्यक्ष अशोक देडे यांनी त्यांचे आभार मानले. यावेळी निलंगा तालुकाध्यक्ष अमोल ढोरशिंगे, उदगीर तालुकाध्यक्ष संजय शिंदे, अहमदपूर तालुकाध्यक्ष विश्वंभर स्वामी, जळकोट तालुकाध्यक्ष ओंमकार सोनटक्के, औसा असिफ पटेल , चाकूर तालुकाध्यक्ष सुशिल वाघमारे, लातूर तालुकाध्यक्ष कलिम पठाण, देवणी तालुकाध्यक्ष सतिश बिरादार, रेणापूर तालुकाध्यक्ष ईश्वर बद्दर आदीसह शहर व ग्रामीणस्तरावरील पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. लातूर जिल्ह्यात पहिल्यांदाच सोशल झुम ॲप द्वारे पत्रकार संघाच्या प्रदेशाध्यक्षांनी थेट पत्रकारांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्याबद्दल पत्रकारातून समाधान व्यक्त करण्यात आले.
COMMENTS