*सोनपेठात कृषी केंद्र फोडले*
सव्वा लाखाचा माल लंपास
सोनपेठ/प्रतिनिधी
सोनपेठ येथे शहराच्या मध्यवसाहतीत असणारे कृषी केंद्र अज्ञात चोरट्यांनी फोडून पोबारा केला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की सोनपेठ शहरातील बसस्थानकासमोर शहरातील संजय पांपटवार यांचे तिरुपती कृषी केंद्र या नावाने कृषी व्यावसायिक दुकान असून या दुकानाच्या माध्यमातून पाम पांपटवार हे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात.मात्र यावर्षी उद्भवलेल्या कोरोना या आजारामुळे बाजारपेठेवर परिणाम झालेला असून त्यातच पुन्हा त्यांचे कृषी केंद्र चोरट्यांनी दिनांक 9 जून रोजी पहाटेच्या सुमारास चोरून कपाशीच्या बँगसह कीटनाशके तुर बियाणे असा एकूण सव्वा लाखाचा ऐवज चोरट्यांनी घेऊन पोबारा केला आहे या ओढवलेल्या संकटामुळे पांपटवार हतबल झाले असून संबंधित चोरीचा तक्रार अर्ज सोनपेठ पोलिसात दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत
COMMENTS