*गट शिक्षणधिकारी प स लोह याना निवेदन सादर*
आज अखिल महाराष्ट्ट प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने मुख्याध्यापकांच्या संदर्भात निवेदन सादर करण्यात आले या वेळी खलील बाबीवर चर्चा करण्यात आली
1) 12 वर्ष सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांचे चटोपाध्याय प्रस्ताव जमा करून जिल्हा स्तरांवर पाठवणे.
2) DCPS धारकांचा सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता रोखीने देने संदर्भात कार्यवाही करणे.
3) DDO1 ला शाळा स्तरावर पगार करण्याचे अधिकार देने .
4) मागील वर्षाचे बिले MDM खात्यावर जमा करणे .
5) तालुका अंतर्गत कार्यरत केंद्रीय मुख्याध्यापकाने अधिकार नसताना महिला शिक्षकेला लेखी नोटीस देऊन आर्थिक लाभापासून वंचित ठेवल्या संबधी सखोल चौकशी करून कार्यवाही करणे.
वरील संदर्भित विषयाने तत्काळ प्रलंबित मागण्या संदर्भात कार्यवाही करू असेआश्वासीत केले .
शेवटी गटशिक्षणाधिकारी साहेबांनी आपल्या नेहमीच्या अडमुठ,एकाधिकारशाही दाखवत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना एक तास ताटकाळात कॅबिनच्या बाहेर उभे करून अपमानित करायला विसरले नाहीत..याचा आम्ही संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करून योग्य वेळी नक्की जाब विचारला जाईल हे मात्र तेवढेच त्रिकालाबाधित सत्य आहे... हेही त्यांनी विसरू नये कारण त्यांच्या खुर्ची पेक्ष्या मोठया खुर्च्या असतात यांचा त्यांना विसर पडलेला दिसतो....
या वेळी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष मुर्तुज शेख ,शिवराज सोनवळे आधी पदाधिकारी उपस्थित होते.
COMMENTS