*
नांदेड (प्रतिनिधी )-
कोरोना विषाणु मुळे एखाद्या रास्त भाव धान्य दुकानदारांचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास त्या कुटुंबाला ५० लाख रुपयाचे विमा संरक्षण दिले जाईल असे आश्वासन वित्त मंत्री नामदार अजित दादा पवार यांनी रास्त भाव धान्य दुकानदारांच्या शिष्टमंडळांला दिले.कोरोना विषाणूच्या संकट काळात रास्त भाव धान्य दुकानदार आपला जीव धोक्यात घालुन काम करत असल्यामुळे त्यांना विमा संरक्षण द्यावे, तामीळनाडू राज्यातील दुकानदारां प्रमाणे राज्यातील दुकानदारांना वेतन देण्यात यावे, मोफत धान्य वाटपाचे कमिशन तातडीने देण्यात यावे ई-पाँज मशिनला येणाऱ्या इंटरनेट च्या अडचणी दुर करण्यात याव्यात या मागण्यां करीता माजी खासदार श्री.गजानन बाबर राज्याध्यक्ष, ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शाँप किपर्स फेडरेशनने १ जुन पासुन संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता या बाबत सर्व संबधीतांना निवेदन पाठविण्यात आले होते संपाचा आज दहावा दिवस होता रास्त भाव धान्य दुकानदारांच्या संपाबाबत योग्य तो तोडगा काढण्यासाठी विधान परिषदेचे उपसभापती श्री.नरहरी झिरवळ यांनी पुढाकार घेवुन वित्तमंत्री मा.नामदार अजित दादा पवार याच्या समवेत बैठक आयोजित केली होती, या वेळी शिष्टमंडळासमोर बोलताना वित्तमंत्री नामदार अजित दादा म्हणाले की सध्याची कोरोना विषाणू मुळे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती पहाता रास्त भाव धान्य दुकानदारांनी संप करणे योग्य नाही.
या आंदोलनामुळे सर्व सामान्य जनतेला होत असलेल्या त्रासाची शक्यता पाहता विधान परिषदचे उपसभापती श्री.नरहरी झिरवळ यांनी रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेचे प्रतिनिधि आणि शासन यांच्यात मध्यस्ती करीत बैठक घडवून आणली.अजित दादा पवार यांच्या सोबत रास्त भाव धान्य दुकानदाराच्या मागण्यां बाबत सविस्तर चर्चा केली.रास्त भाव धान्य दुकानदार हा अत्यावश्यक सेवेचा भाग असुन विषाणू संसर्गाचा धोका रास्त भाव धान्य दुकानदारांना असल्याचे मत त्यांनी प्रकट केले.धान्य वितरण करीत असताना स्वतःची आणि सोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची काळजी घेण्याचेही त्यांनी सुचवले.सर्व काळजी घेऊन सुध्दा लाभार्थ्यांना धान्य वाटप करीत असताना दुर्दैवाने जर रास्त भाव धान्य दुकानदारांच्या बाबतीत कोरोना विषाणू मुळे काही अप्रिय घटना घडल्यास 50 लाख रुपयांचा विमा देण्याचे तोंडी आश्वासन दिलेले आहे व मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच प्रस्ताव आणुन शासन निर्णय काढून दुकानदाराची ही मागणी मार्गी लावण्यात येईल असे तोंडी आश्वासन दिले.
*एखाद्या दुकानदारांचा कोरोनाची बाधा होवुन मृत्यू झाल्यास त्या कुटुंबाला ५० लाख रुपयाचे विमा संरक्षण कवच दिले जाईल तसेच मोफत धान्य वाटपाचे कमीशनही दुकानदारांना अदा करण्यात येईल शासन दुकानदारां बाबत सकारात्मक असुन दुकानदारांनीही आपले कार्य चोख बजवावे दुकानदारांनी तातडीने संप मागे घेवुन शिधापत्रिका धारकांना धान्याचे वितरण सुरु करावे असेही ते म्हणाले या बैठकीस विधान परिषदेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ,आमदार हिरामन खोसकर आमदार नितीन पवार ,विभागीय अध्यक्ष गणपत डोळसे नाशिक जिल्हाध्यक्ष निवृत्ती कापसे सचिव गोपाल मोरे आदि उपस्थित होते* मा.वित्तमंत्र्यांनी असे आश्वासन दिल्यानंतर ऑल महाराष्ट्र फेअर प्राईस शाॅपकिपर्स फेडरेशन पुणे चे अध्यक्ष मा.खा.गजाननजी बाबर यांनी तुर्तास संप मागे घेतल्याची घोषणा केली आहे.तसेच मागण्यां मान्य न झाल्यास पुन्हा वेगळा विचार करावा लागेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यातील रास्त भाव धान्य दुकानदारांनी राज्य नेतृत्वावर विश्वास ठेवत धान्य उचल आणि वितरण न केल्याने ऑल महाराष्ट्र फेअर प्राईस शाॅपकिपर्स फेडरेशन प्रबळ असल्याचे दिसून आले आहे.तरी सर्व दुकानदारांनी उद्यापासून धान्य उचल करून शासन नियमाप्रमाणे शिधापत्रिका धारकांना वितरण करावे जेणेकरून लाभार्थ्यांना कुठल्याही प्रकारची अडचण आणि तक्रार होणार नाही याची दक्षता सर्व दुकानदारांनी घ्यावी. असे आवाहन अशोक जयवंतराव एडके जिल्हाध्यक्ष नांदेड जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार
यांनी केले आहे.
COMMENTS