नांदेड प्रतिनिधी
जिल्हा परिषदेचे माजी उप मुख्य कार्यकारी अधिकारी नईम कुरेशी यांचे आज हैदराबाद येथील दवाखान्यात निधन.. नुकतेच ते सेवा निवृत्त झाले होते.
ग्रामीण विकास यंत्रणेचे सेवा निवृत्त प्रकल्प संचालक नईम कुरेशी यांचे मंगळवार दि.9 जून रोजी हैदराबाद येथे उपचारादरम्यान निधन झाले.
मयत नईम कुरेशी हे दि.31 मे 2020 रोजी सेवानिवृत्त झाले होते.त्यापूर्वी त्यांना 27 मे रोजी ह्रदय विकाराचा झटका आला होता. त्यांना तातडीने उपचारासाठी हैदराबाद येथे हलविण्यात आले होते. मात्र उपचारास प्रतिसाद मिळू न शकल्याने त्यांची प्राणज्योत मावळली.
नईम कुरेशी हे प्रशासनातील अभ्यासू प्रशासक होते. अधिकारी म्हणून ही त्यांची चांगली प्रतिमा होती.त्यांच्या निधनाने वार्ता येताच जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली.त्यांचा अंत्यविधी उद्या दिनांक 10 जून रोजी त्यांच्या मूळगावी औसा जि. लातूर येथे होणार आहे.
COMMENTS