*लातूरात पाच रुग्णांची प्रकृती चिंताजनक*
लातूर global marathwada 9 jun
लातूरात सध्या उपचार घेणाऱ्या पाच कोरोना बाधित रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याचे लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. यात शहरातील मोती नगर मधील दोन, तर शहरातील भाग्यनगर, औशातील कादरी नगर आणि येल्लोरी (ता. औसा) येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या वतीने दररोज सायंकाळी जारी करण्यात येणाऱ्या अहवालात म्हटले आहे की, ज्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत त्यातील पाच रुग्णांची प्रकृती अतिगंभीर स्वरुपाची आहे. हे पाचही रुग्ण सध्या व्हेंटीलेटर सपोर्टवर असून त्यांना फुफुसाच्या दोन्ही बाजुस निमानिया आहे.
त्यातील कादरी नगर (औसा) येथील रुग्णास डायबेटीस असून उच्च रक्तदाबाचा व किडनीचा त्रास आहे. सोमवारी या रुग्णाचे डायलेसीस करण्यात आले. अन्य दोन रुग्णांना उच्च रक्तदाब व दमा आहे तर एका रुग्णास उच्चरक्तदाब आहे. या पाचही रुग्णांची प्रकृती सद्यास्थितीत स्थिर असल्याचे रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
सोमवारी तपासण्यात आलेल्या एकूण २८ व्यक्तींचे स्वॅब तपासण्यात आले. त्यांतील २२ अहवाल निगेटिव्ह आले असून तिघांचे अहवाल अनिर्णित आहेत. तर एक अहवाल प्रलंबीत तर एक अहवाल रद्द करण्यात आला आहे. तसेच, यातील उदगीर येथून आलेल्या १३ व्यक्तींच्या स्वॅब पैकी एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.
COMMENTS