" कोरोना योध्दा " पुरस्काराने पत्रकार बाळु बुध्दे सन्मानित .।.
सप्तफेरे मंडळाचा उपक्रम ....।
लातुर ; कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर
देशभर महामारीचे संकट असताना समाजातील काही व्यक्ती सामाजिक बांधिलकी जपत कोरोनाच्या प्रतिबंधक उपाय योजना राबवित संकटात असणाऱ्या व्यक्तींना, गरजूंना समाजातील काही व्यक्ती समाजसेवा करण्यासाठी सातत्याने झटत असतात. अशा व्यक्तीवर सप्तफेरे वधुवर सूचक मंडळाचे संचालक श्री. संजय नागनाथ राजूळे यांनी लक्ष वेधले. समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या अशा व्यक्तींचा सन्मान व्हावा जेणेकरून अशा व्यक्तींचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजातील इतर व्यक्तीना ही सामाजिक कार्यात पुढे यावे वाटावे या उद्देशाने खास कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सोशल मीडियामध्ये वर्तमानपत्रातून कोरोनाची जनजागृती करणे याशिवाय कोरोना बाबतीत शासनाचे संदेश इतर नागरिकापर्यंत पोहोचणे असे अत्यंत महत्त्वाचे सकारात्मक कार्य करणारे हरंगूळ बूद्रुक येथील लोकमतचे पत्रकार श्री. बाळू बुद्धे, आरोग्य क्षेत्रातल्या जेवळी येथील आशा सेविका श्रीमती मनीषा शिंदे, सेंद्रीय भाजीपाला विक्रेते बाळासाहेब यादव, शेती क्षेत्रातील प्रतिभा खडके,दादाराव पवार हरंगुळ खुर्द सरपंच, सामाजिक क्षेत्रातले लातूर कपडा बँकेचे सचिव सुनीलकुमार डोपे, रयत प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रामदास काळे, कृषी विभागात उल्लेखनीय काम करणारे संचारबंदीच्या काळात शेतकऱ्यांना मदत करणारे आदर्श कृषी सहाय्यक सूर्यकांत लोखंडे, भातांगळीचे पोलीस पाटील महादेव भालेराव यांचा आज लातूरचे नवोदित हास्य कलाकार श्री. बालाजी सूळ व संजय राजूळे यांच्याहस्ते सप्तफेरे वधूवर सूचक केंद्राचे कार्यालयात शाल, सन्मानपञ देऊन गौरविण्यात आले. आपले कार्य असेच समाजातील गरजूंना उपयोगी ठरेल त्यांच्या चेहऱ्यावर आपल्यामूळे हास्य निर्माण व्हावे. कूणालाही एकटेपणा वाटणार नाही, जीवणात नैराश्य येणार नाही असे कार्य हातून घडावे असे यूवा हास्य कलाकार बालाजी सूळ यांनी याप्रसंगी काढले. सूञसंचालक डिगोळे सर यांनी केले तर आभार संजय राजूळे यांनी मानले. यावेळी संजय राजूळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी सर्वजण तोंडावर मास्क बांधून सामाजिक अंतर राखत उपस्थित होते.
COMMENTS