कडा(प्रतिनिधी):लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या पुण्यस्मरणा निमित्त मा.पंकजाताई मुंडे आणि खा.प्रीतमताई मुंडे यांच्या आवाहनास प्रतिसाद देत भारतीय जनता पार्टीचे आष्टी तालुका सरचिटणीस शंकर देशमुख यांनी कडा या ठिकाणी मुंडे साहेबांचा पुण्यस्मरण दिन हाच सेवादिन या वाक्याला साजेश्या पद्धतीने ग्रामपंचायतींचे स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान केला
लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब यांनी आयुष्यभर दिनदलीतांच्या व वंचिताच्या उद्धारासाठी आयुष्य वेचले होते त्याच्या पुण्यतिथी दिन हा सेवादिन म्हणुन देखील साजरा व्हावा अशी कल्पना लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांनी मांडली आणि म्हणुनच कोरोना प्रादुर्भाव पार्श्वभूमी कडा ग्रामपंचायतीच्या कर्मचारी वर्गाने या काळात अहोरात्र ग्रामस्थांची सेवा केली होती या मधे गावातील स्वच्छता असेल सॅनिटाझर करणे असेल तसेच जनजागृती असेल असे विविध कामे या सर्वांनी केली होती या सर्व कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्याचे सरचिटणीस शंकर देशमुख यांनी ठरविले होते मुंडे साहेबांचा पुण्यतिथी दिना हा सेवादिन म्हणुन श्रीराम मंदिरात हा सन्मान करण्या आला या प्रसंगी कडा ग्रा.प.सरपंच अनिल ढोबळे उपसरपंच योगेशजी भंडारी ग्रा प सदस्य प्रशांत देशमुख सचिन शिंदे नागेश कर्डीले, प्राचार्य हरिदास विधाते, राजेंद्र शिंदे, बाबुशेट भंडारी,महेश पवळ अनंतराव देशमुख उपस्थित होते लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेबांचे प्रतिमा पूजन करुन 13 महिला कर्मचारी व 7 पुरुष कर्मचारी याचा साडी,व कपडे मान्यवरांचे हस्ते देऊन सन्मान करण्यात आला शंकर देशमुख यांनी स्वखर्चाने हा उपक्रम राबविला असुन कडा गावातील गोरगरिबांना कोरोना लाॅकडाऊनचे काळात 29 दिवस घरपोच खिचडीचे पॅकेट जेवणाचे वाटप केले होते त्याच प्रमाणे संतुर साबणाचे वाटप केले होते लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेबांचे शंकर देशमुख विश्वासू कार्यकर्ते आहेत मुंडे साहेबांना मानणारा कडा येथे मोठा वर्ग आहे. कोणत्याही निवडणुकीची समारोप सभा मुंडेसाहेब कडा येथील मौलाली बाबा दर्गा परिसरात घेत आणि यशस्वी होई भावाना अनावर झाल्या सर्वांना शंकर देशमुख यांचे कोरोना काळातील या उपक्रमाचे कडा ग्रामस्थांनी कौतुक केले आहे
COMMENTS